मलाला आणि तिचा नवरा अशर यांचा हा व्हीडिओ होत आहे व्हायरल

फोटो स्रोत, MALIN FEZEHAI
नोबेल पुरस्कार विजेती मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफझाई आणि तिच्या नवऱ्याचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हीडिओमध्ये मलाला युसुफझाई आणि तिचा नवरा अशर मलिक हे दोघे नवीन वर्षांचे संकल्प ठरवत आहेत. पण तो ठरवण्यासाठी ते दोघं एक कौल घेत आहेत.
टेबलच्या एका बाजूला पाण्याने अर्धा भरलेला एक ग्लास आहे. दुसऱ्या कडेला मलाला आणि अशर दोघे बसले आहेत. आधी आपला संकल्प सांगायचा.
मग हातातला एक पेन त्या ग्लासात टाकायचा. जर तो ग्लासात पडला तर पुढील वर्षाचा तो संकल्प असेल. असं दोघांनी ठरवल्याचं त्या व्हीडिओत दिसतं.
पहिला संकल्प मलालाने सांगितला, ती म्हणते की येणाऱ्या वर्षात मी जिमला जायला हवं का? त्यानंतर ती ग्लासात पेन फेकते, पण पेन ग्लासात पडत नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यानंतर अशर म्हणतो की, आपण प्ले स्टेशन विकत घ्यायला हवं का, पेन ग्लासात पडत नाही.
त्यानंतर पुन्हा मलाला संकल्प करते की, अशरने त्याची दाढी काढावी का? आणि पेन फेकते पण पेन ग्लासात पडत नाही. पुढे तीच म्हणते नाही, दाढी काढण्याची परवानगी तुला नाही. जर दाढी काढलीस तर घर सोडावे लागेल.
आता पुन्हा अशरचा नंबर येतो तो म्हणतो, नवीन वर्षात मलालाने 'नो शॉपिंग जानेवारी' पाळून शॉपिंगला जाणे टाळले पाहिजे का?
यावेळी देखील पण ग्लासात पडत नाही. जानेवारीमध्ये नो शॉपिंग पाळण्याची गरज नाही असं कळल्यावर मलाला आपला आनंद जोरात हसून व्यक्त करते.

फोटो स्रोत, MALIN FEZEHAI
त्यानंतर मलाला म्हणते जे लोक हा व्हीडिओ पाहत आहेत त्यांनी मलाला फंडसाठी डोनेशन करायला हवे का? यावेळी ती स्वतः उठते आणि पेन ग्लासात टाकून सर्वांनी मुलींच्या शिक्षणासाठी सहकार्य करावे असं आवाहन करते.
हा दीड मिनिटांचा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
24 वर्षीय मलालाने अशर मलिकसोबत नोव्हेंबर महिन्यात लग्न केले. त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले होते आणि इंस्टाग्राम, ट्विटरवर आपल्या लग्नाची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
कोण आहे मलालाचा नवरा?
मलाला क्रिकेटची चाहती आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने क्रिकेटचा उल्लेख केला आहे. योगायोगाने मलालाचे पतीही क्रिकेटशी संबंधितच आहेत.

फोटो स्रोत, MALIN FEZEHAI
अशर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरचे जनरल मॅनेजर आहे.
लाहोरच्या प्रतिष्ठित एचिसन महाविद्यालयातून अशरने कायद्याची पदवी घेतली. यानंतर लाहोर विद्यापीठातून त्याने मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर काम करण्याआधी ते पाकिस्तान सुपर लीगमधल्या मुलतान सुलतान्स संघासाठीही कार्यरत होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी क्रिकेटच्या विकासाकरता नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना केली होती. माजी क्रिकेटपटू नसीम खान या सेंटरचे संचालक आहेत.
माजी खेळाडू साकलेन मुश्ताक यांची इंटरनॅशनल प्लेयर डेव्हलपमेंट हेडपदी नियुक्ती करण्यात आली. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ग्रँड ब्रॅडबर्नला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























