टोकियो : ट्रेनमध्ये चाकूने हल्ला आणि आग

टोकियो घटना

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

जपानची राजधानी टोकियोमध्ये रविवारी (31 ऑक्टोबर) अंडरग्राऊंड ट्रेनमध्ये एका व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर त्यानं डब्ब्याला आग लावून दिली. या घटनेत 17 जण जखमी झाल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी याप्रकरणी एका 24 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीनं बॅटमॅन कॉमिक्समधील जोकरच्या भूमिकेसारखे कपडे परिधान केले होते.

अनेक जण हॅलोविन पार्टीला जात असताना हा हल्ला घडून आला. या व्यक्तीनं एका स्प्रेच्या माध्यमातून ट्रेनच्या डब्ब्यात एक द्रव्य फवारलं आणि मग आग लावून दिली.

लोक आगीपासून वाचण्यासाठी दुसऱ्या डब्ब्यांकडे धाव घेत आहेत आणि खिडक्यांमधून उडी घेत असल्याचं या घटनेसंबंधित व्हीडिओत दिसून येत आहे.

कुर्क्यू स्थानकावर रविवारी (31 ऑक्टोबर, 4 वाजण्याच्या सुमारास) हा हल्ला झाला. हल्लेखोरानं हिरव्या रंगाचा सूट घातल्याचं प्रवाशांनी सांगितलं.

एका प्रत्यक्षदर्शीनं योमियूरी या वर्तमानपत्राला सांगितलं, "मला आधी वाटलं तो हॅलोविनचा स्टंट करत आहे. पण, नंतर तो एक मोठा चाकू इकडेतिकडे फिरवत आमच्याकडे येत होता."

एपी या वृत्तसंस्थेनुसार, टोकियो अग्निशमन विभागानं या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं आहे.

एका वृद्ध व्यक्ती चाकू हल्ल्यात बेशुद्ध झाल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे.

या घटनेचा व्हीडिओ रेकॉर्ड करणाऱ्या शूनस्के कीमुरा यांनी जपानचा सरकारी मीडिया एनएचकेला सांगितलं की, "हा खूपच भयंकर प्रकार होता. ट्रेनचे दरवाजे बंद होते आणि काय होतंय तेच आम्हाला कळत नव्हतं. त्यानंतर आम्ही खिडक्यांमधून उड्या मारायला सुरुवात केली."

या घटनेत अटक केलेल्या संशयितानं 'मला मृत्यूची शिक्षा मिळावी, म्हणून मी लोकांना मारू इच्छित होतो', असं म्हटल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)