Pakistan Earthquake : बलुचिस्तानमध्ये भूकंप 20 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गुरुवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून यात किमान 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.7 होती.

भूकंपामुळं झालेल्या मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचं आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

भूकंपाचे धक्के जाणवायला लागल्यानंतर क्वेटा शहरातील लोक घराबाहेर पडून रस्त्यावर आल्याचे फोटो सोशल सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडियो : भूकंप आला तर...

भूकंपामुळे काही इमारती कोसळल्यात आणि त्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्यानं दिली.

स्थानिक अधिकाऱ्यांनी बीबीसी ऊर्दूला दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे किमान 150 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी गंभीर असलेल्या काही जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेनंतर अजूनही मदतकार्य सुरू आहे. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या महिला आणि लहान मुलांची असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

بلوچستان

फोटो स्रोत, Yazdani Tareen

हरणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटाच्या पूर्वेला हरणी जिल्हा असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत.

आपत्कालीन सेवा संबंधित ठिकाणी रवाना करण्यात आल्या असल्याची माहिती बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर झियाउल्लाह लंगू यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

काही लोकांवर स्ट्रेचरवरच उपचार करण्यात आले. अंधार असल्यानं मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात उपचार करण्यात आल्याचं रॉयटर्सनं म्हटलं.

तसंच 100 पेक्षा अधिक मातीची घरं कोसळली तर मोठ्या संख्येनं इमारतींचं नुकसान झालंय. शेकडो लोक बेघर झाले आहेत, असंही एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)