टोकियो ऑलिम्पिक: लॉकडाऊनमध्ये बागेतल्या छोट्या स्विमिंग पूलमध्ये सराव करत त्याने जिंकलं सुवर्णपदक

फोटो स्रोत, Getty Images
18 महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. एकामागून एक देश लॉकडाऊन लागू करत होता.
ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या खेळाडूंना याचा त्यावेळी जोरदार फटका बसला. जलतरणपटू मॅट रिचर्ड्स त्यापैकीच एक.
ग्रेट ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर रिचर्ड्स खूपच चिंताग्रस्त झाला होता. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असल्यामुळे त्याला काही दिवस स्विमिंग पूलला जायला मिळालं नाही.
आपली आतापर्यंतची तयारी वाया जाईल, अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली.
पण, नाईलाजाने त्याने स्वतःच एक छोटा गार्डन पूल विकत आणला. या छोट्याशा हौदवजा पूलमध्ये सराव करता-करता मॅट रिचर्ड्स याने ऑलिम्पिक सुवर्णपदकापर्यंत मजल मारली आहे.
ही कामगिरी केल्यामुळे रिचर्ड्स आणि त्याचा सहकारी कॅलम जार्वीस हे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे वेल्सचे पहिलेच खेळाडू बनले आहेत. दोघांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांना अतिशय आनंद झाला.
मॅट आणि त्याच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या यशामुळे आम्हाला अत्यानंद झाला आहे. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे," अशी प्रतिक्रिया मॅटच्या आई अमांडा यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

फोटो स्रोत, Getty Images
मॅट रिचर्ड्सचा हा पहिलाच ऑलिम्पिक सहभाग आहे. पुरुष रिले 200 मीटर या खेळप्रकारात त्याचे सहकारी डंकन स्कॉट, जेम्स गाय, दोनवेळचा ऑलम्पिक चॅम्पियन टॉम डीन यांच्यासोबत तो स्पर्धेत उतरला होता.
विजयी कामगिरी करणाऱ्या मॅट रिचर्ड्सच्या आई अमांडा रिचर्ड्स यांची मुलाखत बीबीसी रेडिओने केली.
यामध्ये अमांडा रिचर्ड्स म्हणतात, "नेमकं काय घडलं, हे शब्दांत सांगणं कठीण आहे. पण आमच्या संघाची कामगिरी अतियश लक्षवेधी ठरली.
कोव्हिड लॉकडाऊन आमच्यासाठी अतिशय कठीण काळ होता. स्विमिंग पूल बंद असल्यामुळे मुलाला सराव करण्यास मिळायचा नाही. ही खूप मोठी समस्या होती.
त्याला सरावासाठी पाणी मिळवून देणं अतिशय कठीण काम होतं. त्यामुळे त्याची स्पर्धेसाठी सुयोग्य तयारी होते किंवा नाही, हा प्रश्न आम्हाला पडला होता.
तो काळ अत्यंत कठीण होता, असं मॅटचे वडील सायमन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
लॉकडाऊनमुळे मॅटला पुन्हा सराव करायला कधी मिळेल, हा प्रश्न आम्हाला सतावत होता.
आम्ही खूप कंटाळलो होतो. पण आता पदक जिंकल्यामुळे आमच्यावरील सर्व मळभ दूर झालं आहे, असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
एका डच जलतरणपटूला गार्डन पूलमध्ये सराव करताना पाहिल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचा पूल विकत आणला.
त्यांनी आपल्या बागेत मागील बाजूस पाच मीटर लांब, तीन मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असलेला एक स्विमिगपूल लावला.
मॅट रिचर्ड्स दिवसभर याच पूलमध्ये सराव करत बसायचा. या सरावाचा मॅटला खूप चांगला फायदा झाला, असं अमांडा सांगतात.
मॅट रिचर्ड्सचा जन्म वर्केस्टरमध्ये झाला होता. पण त्याने स्वतःची नोंदणी वेल्श नागरिक म्हणून केली होती.
सुवर्णपदक पटकावलेल्या संघात मॅटप्रमाणेच 29 वर्षीय जार्वीसही होता. तोसुद्धा एक वेल्श खेळाडूच आहे.
जार्वीसची पत्नी जेमा हीसुद्धा दोन वेळची ऑलम्पिक पदकविजेती आहे. तिने सर्वांचं अभिनंदन केलं.

फोटो स्रोत, Getty Images
ती म्हणते, मी आज खूप आनंदी आहे. त्यांना मिळालेलं यश खूप मोठं आहे.
कोव्हिडदरम्यानचा काळ अतिशय आव्हानात्मक होता, असं जेमानेही सांगितलं.
जार्वीस स्विमिंग पूलपासून बराच काळ दूर होता. कदाचित तीन महिने त्याने सरावच केला नव्हता. स्पर्धा होणार की नाही, काहीच खात्री नव्हती. पण अखेर स्पर्धा पार पडली. अशा स्थितीत खेळाडूंनी फक्त आपल्या खेळावरच लक्ष केंद्रीत करणं आवश्यक असतं. त्याचा त्यांना स्पर्धेदरम्यान फायदा होतो, असं जेमाला वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























