रवी दहियाचा अंतिम सामन्यात पराभव, रौप्य पदकावर मानावे लागले समाधान

रवी दहिया

फोटो स्रोत, Maddie Meyer

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात झालेल्या फ्रिस्टाइल कुस्तीमध्ये रवी दहियाचा रशिया ऑलिपिंक कमिटीच्या जेवर उगुएवकडून पराभव झाला. त्यामुळे रवी दहियाला रौप्य पदक आणि जेवरला सुवर्ण पदक मिळाले आहे.

26 वर्षिय जेवर उगुएवने 2018 आणि 2019 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 2019 साली युरोपियन क्रीडा स्पर्धेतही त्याचा तिसरा नंबर आला होता.

यापूर्वी उपांत्यफेरीत रवी दहियाने कजाखस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

ऑलिम्पिकमधील पराभवानंतर जातीवाचक शिवीगाळ, वंदना कटारियांच्या कुटुंबीयांचा आरोप

भारतीय महिला हॉकी टिममधील फॉरवर्ड खेळाडू वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलंय.

बुधवारी ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीच्या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने भारतीय संघाचा पराभव केला.

या सामन्यानंतर उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रोशनाबाद गावात वंदना यांच्या घराबाहेर कथितरित्या दोघांनी जातीवाचक अपशब्द वापरले.

घरासमोर जातीवाचक शिवीगाळ करत फटाके फोडण्यात आल्याचं वंदना यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

वंदनाचे भाऊ शेखर यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं, "पराभवामुळे आम्ही दुःखी होतो. तेवढ्यात अचानक घराबाहेर फटाखे फोडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही बाहेर येऊन बघितलं तर आमच्याच गावातले दोघे होते. आम्ही त्यांना ओळखतो आणि ते वरच्या जातीचे आहेत. ते आमच्या घराबाहेर नाचत होते. जातीवाचक शिवीगाळ करत होते. आमच्या कुटुंबाचा अपमान करत होते. इतकंच नाही तर भारतीय महिला टीममध्ये अनेक खेळाडू दलित असल्यामुळे भारत हरल्याचं म्हणत होते."

या प्रकरणी एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून एकाला अटक केल्याची माहिती बीबीसीचे सहकारी पत्रकार ध्रुव मिश्रा यांनी दिली.

विनेश फोगाटचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव

टोकियो ऑलिम्पकमध्ये पदकाची प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाटला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उपांत्यपूर्व फेरीत बेलारुसच्या वनिसा कलादजिस्कायानं तिला पराभूत केलं.

पहिल्या तीन मिनिटांमध्येच वनिसानं विनेशच्या विरोधात आघाडी घेतली होती. विनेशनं आक्रमक डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण वनिसाचा बचाव त्याच तोडीचा होता.

अखेरच्या एका मिनिटामध्ये आक्रमक डाव टाकण्याच्या प्रयत्नात विनेशचे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आणि वेळ संपवण्यापूर्वीच तिचा पराभव झाला.

विनेशनं त्यापूर्वी स्वीडनच्या सोफिया मॅगडेलेना मॅटसनला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तिनं या सामन्यात 7-1 नं विजय मिळवला होता.

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

विनेशनं 53 किलो वजन गटात गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विजेतेपद पटकावत तिनं क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं.

2016 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळं विनेशचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळं यावेळी तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण उपांत्यपूर्व फेरीत तिचा पराभव झाला.

आता रेपिचाझमध्ये संधी मिळाली तर विनेशला कांस्य पदकासाठी सामन्यात खेळता येईल.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

उपांत्यपूर्व फेरीत वनिसानं विनेशला पराभूत केलं आहे. आता वनिसा फायनलमध्ये पोहचली तर रेपिचाझनुसार कांस्यपदकाच्या सामन्यासाठी विनेशला संधी मिळेल.

रेपिचाझ राऊंड म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये हरवणारा प्रतिस्पर्धी जर त्या गटात मेडल मॅचेसपर्यंत गेला तर तुम्हाला ब्राँझ मेडलची आणखी एक संधी मिळते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)