कोरोना: अॅस्ट्राझेनेका लस देणं डेन्मार्कने बंद का केलं?

संजय राऊत

फोटो स्रोत, EPA

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना व्हायरसवर बनवलेल्या लसीवर डेन्मार्कने स्थगिती दिली आहे. असं करणारा डेन्मार्क हा पहिलाच युरोपीय देश बनला आहे.

ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी बनत असल्याच्या तक्रारी आल्याने ही स्थगिती लावण्यात आली. पण अशा प्रकारच्या तक्रारी दुर्मिळ स्वरुपाच्या आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं.

डेन्मार्कच्या या निर्णयामुळे त्याचा लसीकरण मोहिमेवर प्रभाव पडू शकतो.

युरोपात औषधांचं देखरेख करणाऱ्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने गेल्या आठवड्यात म्हटलं होतं, रक्ताच्या गाठी बनण्याचा संबंध लसीसोबत असू शकतो. पण यापेक्षाही कोव्हिड-19 मुळे मृत्यूचा धोका कित्येक पटींनी मोठा आहे.

युरोपातील काही देशांनी याआधीही अॅस्ट्राझेनेका लसीचा वापर काही काळ थांबवला होता.

बहुतांश युरोपीय देशांत अॅस्ट्राझेनेकाचं लसीकरण राबवण्यात येत आहे. पण वयस्कर लोकांवर या लसीचा वापर करण्यावर काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

मंगळवारी, अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा वापरही याच कारणांमुळे रोखला होता.

दक्षिण आफ्रिकेतही याच कारणामुळे जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या वापरावर स्थगिती आणली होती.

कोरोना व्हायरसच्या दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटवर जॉन्सन अँड जॉन्सनची लस प्रभावी ठरली होती.

लस

फोटो स्रोत, Reuters

ही दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय लस आहे. पण तरीसुद्धा याच्या वापरावर स्थगिती आणण्यात आली, हे विशेष.

अॅस्ट्राझेनेकाआणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसी एकाच प्रकारे काम करतात. त्यांना एडनोव्हायरल व्हेक्टर म्हटलं जातं.

डेन्मार्कने स्थगिती का आणली?

पुढील आदेश मिळेपर्यंत आपण अॅस्ट्राझेनेका लसीच्या सर्वच्या सर्व 24 लाख डोसेस मागे घेत आहोत, असं डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर 40 हजारांमागे एका व्यक्तीला रक्तात गाठी होण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

AFP च्या अहवालानुसार डेन्मार्कमध्ये रक्तात गाठी झाल्याच्या दोन प्रकरणांमध्ये लस कारणीभूत ठरल्याचं आढळून आलं. यामध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यूही झाला.

कंपनीचे महासंचालक सोरेन ब्रोस्ट्रोम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

"सरकारसाठी हा निर्णय अवघड होता. पण डेन्मार्ककडे लसीचे इतर पर्यायही उपलब्ध आहेत. सध्यातरी देशातील कोरोना साथ नियंत्रणात आहे," असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "देशात ज्यांना कोरोना लस देण्यात येईल त्यांचा कोव्हिडचा धोका कित्येक पटींनी कमी झाला आहे."

देशात पुन्हा अॅस्ट्राझेनिका लसीचा वापर होऊ शकतो का, ही शक्यता अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली नाही.

डेन्मार्कमध्ये आतापर्यंत सुमारे 10 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यापैकी दीड लाख लोकांना अॅस्ट्राझेनेका लस देण्यात आली आहे.

डेन्मार्कमध्ये फायझर बायोएनटेक आणि मॉडर्ना या कंपनीच्या लसींचा वापरही करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)