नरेंद्र मोदी यांना ट्रंप यांच्याकडून 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्कार

नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सोमवारी (22 डिसेंबर) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्काराने गौरवलं.

अमेरिका आणि भारत यांच्या रणनीतीच्या दृष्टीने संबंध अधिक कणखर केल्याबद्दल आणि भारताला जागतिक ताकद म्हणून पुढे आणण्यासाठी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे.

PTI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, "अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंह सिंधू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे हा पुरस्कार स्वीकारला. तरनजीत सिंह सिंधू यांना व्हाईट हाऊसमध्ये हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी दिला."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ओब्रायन यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबतचे रणनितीबाबतच्या संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी लीजन ऑफ मेरिट पुरस्कार दिला आहे."हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव पंतप्रधान आहेत. ओब्रायन यांनी त्यांच्या पुढच्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही लीजन ऑफ मेरिड पुरस्काराने गौरवण्यात आलंय."

नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

ऑस्ट्रेलिया आणि जपानच्याही राजदूतांनीच त्यांच्या त्यांच्या पंतप्रधानांतर्फे हा पुरस्कार स्वीकारला.

याआधीही म्हणजे मोदींचे असे गौरव झाले आहेत. 2016 साली सौदी अरेबिया, 2019 साली यूएई आणि 2019 सालीच रशिया, मालदीव या देशांनी आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)