मास्टरकार्डने पॉर्नहबशी संबंध तोडले कारण...

फोटो स्रोत, Getty Images
पॉर्नहब या वेबसाईटची पाहणी केल्यानंतर, आक्षेपार्ह स्वरुपाचा मजकूर आढळल्याने मास्टरकार्ड कंपनीने या वेबसाईटशी असलेले संबंध तोडले आहेत. यापुढे पॉर्नहबच्या वेबसाईटवर मास्टरकार्ड कंपनीचं कार्ड वापरून व्यवहार करता येणार नाहीत.
न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या शोधमोहिमेत पॉर्नहबवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे तसंच बलात्काराचे व्हीडिओ असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पॉर्नहबने न्यूयॉर्क टाईम्सने केलेले दावे फेटाळलेत. मास्टरकार्डने घेतलेला निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचं पॉर्नहबने म्हटलं आहे.
व्हिसा कंपनीनेही पॉर्नहबवर कंपनीचं कार्ड वापरण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या अंतर्गत पाहणीनंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.
पुलित्झर पुरस्काविजेते पत्रकार निकोलस क्रिस्टोफ यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं की, सर्च इंजिन्स, बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या यांच्यामुळे पॉर्नहबचं प्रस्थ वाढतं आहे हे आपल्याला कळत नाही का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गेल्या काही आठवड्यात आम्ही पॉर्नहबवरच्या मजकुराची सविस्तर तपासणी केली. या साईटवरचा काही मजकूर नियमांच्या चौकटीत बसणारा नाही, असं मास्टरकार्ड कंपनीने म्हटलं आहे.
पॉर्नहब आणि मास्टरकार्ड यांच्यात आर्थिक व्यवहार करून देणाऱ्या आर्थिक संस्थांना आम्ही संबंध तोडण्यास सांगितलं आहे, असंही मास्टरकार्डने म्हटलं आहे.
पॉर्नहबवरच्या त्या नियमबाह्य मजकुरासंदर्भात काय कारवाई करता येईल याकरता मजकुराची तपासणी सुरूच होईल.
दरम्यान न्यूयॉर्क टाईम्सने आमच्या मजकुरासंदर्भात केलेला दावा बेजबाबदार आणि अतिशय खोटा असल्याचं पॉर्नहब वेबसाईट चालवणाऱ्या माइंडगीक कंपनीने म्हटलं आहे.
पॉर्नहबने साईटवरचा डाऊनलोड पर्याय काढून टाकला आहे. साईटवर व्हीडिओ अपलोड करण्यासाठी युझर्सचं अकाऊंट व्हेरिफाय असणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मास्टरकार्डाने केलेल्या कारवाईला उत्तर देताना पॉर्नहबने म्हटलं आहे की, मास्टरकार्डने कंपनीने घेतलेला निर्णय खूपच निराशाजनक आहे. पॉर्नहबने दोनच दिवसांपूर्वी युझर जनरेटेड मजुकरासंदर्भात सर्वसमावेशक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली होती.
व्हेरिफाईड नसलेल्या युझर्सना आता पॉर्नहबवर मजकूर टाकण्याची परवानगी नाही. अन्य कोणत्याही वेबसाईटवर असा नियम करण्यात आलेला नाही. अगदी फेसबुकवरही नाही.
लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील मजकूर फेसबुकवर गेल्या तीन वर्षांत 84 दशलक्ष वेळा समोर आला आहे. याच्या तुलनेत गेल्या तीन वर्षांत इंटरनेट वॉच फाऊंडेशनला पॉर्नहबवर अशा स्वरुपाचा मजकूर केवळ 118 वेळा आढळला आहे.
पॉर्नहबवर अवलंबून असणाऱ्या हजारो मॉडेल्सचं करिअर उद्धस्त करून टाकणारा निर्णय आहे, असं पॉर्नहबचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, SOPA Images
पॉर्नहब ही मुक्त वेबसाईट आहे. युझर ठराविक पैसे भरून हाय डेफिनेशन व्हीडिओ तसंच जाहिरातीविरहीत आणि एक्सक्लुसिव्ह स्वरुपाचा मजकूर पाहू शकतात.
पॉर्नहबवरचा मजकूर त्यांच्या कम्युनिटीद्वारेच अपलोड केला जातो आणि तो सर्वांना पाहता येतो.
मात्र अपलोड झालेला प्रत्येक व्हीडिओ मानवी परीक्षणातून गेल्यानंतरच तो सगळ्यांना दिसू लागतो असं पॉर्नहबने म्हटलं आहे.
सगळ्यांत अलीकडच्या वार्षिक पाहणीनुसार, 2019 मध्ये 42 अब्ज लोकांनी साईटला भेट दिली. 6.83 दशलक्ष व्हीडिओ पॉर्नहबवर अपलोड करण्यात आले. व्हीडिओ पाहण्याचा एकत्रित वेळ 169 वर्षं एवढा आहे. मजकुराची शहानिशा करण्यासाठी किती मॉडरेटर्स नियुक्त केले आहेत याबाबतचा तपशील पॉर्नहबने दिलेला नाही.
क्रिस्टोफ यांनी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की, "लहान मुलांच्या शोषणासंदर्भातील व्हीडिओंना व्ह्यूज अधिक आहेत".
दरम्यान लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबल्याचं पॉर्नहबने म्हटलं आहे. गुगल, युट्यूब आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी तयार केलेल्या उपकरणांच्या माध्यमातून अशा स्वरुपाचा मजकूर आढळल्यास तो डिलिट केला जातो, असं कंपनीचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















