कराची हल्ला: पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये गोळीबार, हल्लेखोरांसहित किमान 7 जण ठार

कराचीतील पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये गोळीबार झाला असून त्यात हल्लेखोरांसहित किमान सात ठार झाल्याचे वृत्त आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कराचीमध्ये असलेले प्रतिनिधी रियाज सोहेल यांनी सांगितलं की ही घटना सकाळी 10 वाजता घडली. सुरुवातीच्या वृत्तानुसार हल्लेखोर पार्किंग लॉटमधून इमारतीमध्ये घुसले आणि त्यांनी रस्ता मोकळा व्हावा म्हणून हॅंडग्रेनेड फेकले.
संस्थेचे प्रमुख फैसल ईदी यांनी सांगितलं की आज सकाळी दहा वाजता चार हल्लेखोरांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना सेक्युरिटी गार्ड आणि पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
या चकमकीत 1 पोलीस आणि दोन सेक्युरिटी गार्ड ठार झाले. तसेच चारही हल्लेखोर ठार झाल्याचं ईदी यांनी सांगितलं आहे.
या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. सरकारने बंदी घातलेल्या या गटाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे की गटाच्या माजिद ब्रिगेडने हे कृत्य केलं आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं सापडली
सिंध प्रांताचे अॅडिशनल आईजी गुलाम नबी मेनन यांनी बीबीसीला सांगितलं की हल्लेखोर सिल्वर कलरच्या कोरोला कारमध्ये आले. त्यांना पोलिसांनी तिथेच थांबवलं. ते सांगतात की दोन हल्लेखोरांना पोलिसांनी गेटवरच ठार केलं. पण नंतर दोन हल्लेखोर आतमध्ये घुसले आणि त्यांनाही नंतर ठार करण्यात आलं.

गुलाम नबी सांगतात की हल्लेखोर मुख्य इमारतीमध्ये घुसू शकले नाहीत. त्यांच्याकडे काही हत्यारं आणि ग्रेनेड सापडली.
पण स्टॉक एक्सचेंजचे संचालक अबिद अली हबीब यांचं म्हणणं वेगळं आहे. जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले हल्लेखोर ट्रेडिंग हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला.
दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला - कराची पोलीस
पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट मोडून काढल्याचं पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. पोलीस आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, AFP
या हल्ल्यात कराचीचे पोलीस सब-इंस्पेक्टर शाहिद मृत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. हल्ला झाला त्यावेळी शाहिद हे गेटवर होते. त्यांच्याबरोबरच तीन पोलीस जखमी झाले आहेत.
पोलिसांनी वेळेवर कारवाई केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यामुळे इमारतीमध्ये असलेल्या अनेकांचे प्राण वाचले.
या हल्ल्यात चार सुरक्षा रक्षक आणि एक नागरिक ठार झाल्याचं पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
पोलीस आणि सैनिक सध्या इमारतीची झडती घेत आहेत.
सिंधच्या गव्हर्नरने केला निषेध
सिंधचे गव्हर्नर इम्रान इस्माइल यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ते म्हणतात की "पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. पाकिस्तान सरकारने दहशतवादाविरोधात जी कठोर पावलं उचलली आहेत त्यांना बदनाम करणं हाच या हल्ल्याचा उद्देश असावा. आयजी आणि सुरक्षा एजन्सीजला असे आदेश देण्यात आले आहेत की गुन्हेगारांना जिवंत पकडण्यात यावं आणि या घटनेचे जे सूत्रधार आहेत त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. आम्ही कोणतीही किंमत मोजून सिंध प्रांताचं रक्षण करण्यासाठी तत्पर आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
कराची स्टॉक एक्सचेंज हे पाकिस्तानमधील सर्वांत मोठं स्टॉक मार्केट आहे. कराचीच्या सर्वांत व्यग्र महामार्गाच्या कोपऱ्यावर ही इमारत आहे. त्याच बरोबर या भागात पोलिस हेडक्वार्टर, बॅंक, वाहिन्यांचे कार्यालय आहेत. त्यामुळे हा भाग गजबजलेला असतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























