पाकिस्तान: परराष्ट्र सेवेतील दोन अधिकारी इस्लामाबादेत पोलिसांच्या ताब्यात

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

भारतीय उच्च आयुक्तालयातील दोन कर्मचारी इस्लामाबाद पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी पाकिस्तानमधील मीडियात सुरू आहे.

हे दोन अधिकारी सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून बेपत्ता होते.

वृत्तसंस्था ANI नुसार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिल्लीस्थित पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क करून या कर्मचाऱ्यांच्या बेपत्ता होण्याविषयी तक्रार दाखल केली होती.

पण, ANI आणि PTI या दोन्ही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी अधिकृत निवेदन दिलेलं नाही.

तर तिकडे पाकिस्तानातही कुणी अधिकृतरीत्या बोलायला तयार नाही.

इस्लामाबादमधील बीबीसी प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांच्या मते, भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्यानं आपले दोन सहकारी बेपत्ता असल्याचं सांगितलं, पण याविषयी अधिकची माहिती दिली नाही.

कोरोना

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंही कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही.

पण, काही वेळापासून पाकिस्तानची मीडिया पोलीस सूत्रांच्या आधारे बातमी देत आहेत की, इस्लामाबाद पोलिसांनी भारतीय अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

इस्लामाबाद पोलिसांच्या हवाल्यानं बातमी दाखवली जात आहे की, "भारतीय दूतावासातील दोन अधिकारी काळ्या रंगाची BMW (गाडी क्र. QL-104) बेशिस्तपणे चालवत होते आणि त्यांनी एका पादचाऱ्याला धडक दिली. यानंतर हे दोन्ही अधिकारी पळून जायच्या प्रयत्नात होते, पण तिथं उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं."

दोन्ही अधिकाऱ्यांच्या सद्यस्थितीविषयी ना इस्लाबादच्या पोलिसांनी काही वक्तव्य केलंय, ना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही प्रतिक्रिया दिलीय.

भारत सरकारकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

काही आठवड्यांपूर्वी भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांवर हेरगिरी करण्याचा आरोप लावत त्यांना पाकिस्तानात पाठवून दिलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)