ट्रंप यांच्या `त्या' फोन कॉलचे तपशील लपवण्याचा प्रयत्न

फोटो स्रोत, Reuters
व्हाइट हाउसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातील फोनवरील संभाषणाचा तपशील लपवण्याचा प्रयत्न केल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात तक्रार करणाऱ्या एका व्यक्तीचं म्हणणं आहे.
अलिकडेच प्रकाशित झालेल्या या तक्रारीमध्ये, फोनवरील संभाषण नेहमीच्या कम्प्यूटर यंत्रणेऐवजी एका वेगळ्या यंत्रणेत ठेवण्यात आलं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यानंतर तक्रार करण्यात आलेलं संभाषण सार्वजनिकरीत्या जाहीर करण्यात आलं, त्या आधारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 2020 साली होणाऱ्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी ट्रंप आपल्या ताकदीचा वापर करत आहेत, अशी माहिती काही सूत्रांनी दिल्याचा आरोप तक्रारदारानं केला आहे.
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सचे कार्यवाहक संचालक जोसेफ मैगूरे काँग्रेस समितीसमोर हजर झाले आहेत.
डेमोक्रॅट्स म्हणजेच ट्रंप यांच्या प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि त्यांचा मुलगा हंटर यांच्याविरुद्धच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू करावी यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर आहे.सर्वांसमक्ष सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर महाभियोग कारवाई करणार असल्याचे नक्की झाले आहे, असे अमेरिकेच्या ज्येष्ठ सभागृहाचे, सिनेटचे डेमोक्रेटिक पार्टीचे नेते चक शूमर यांनी स्पष्ट केले. याबरोबरच ओकाहोमाचे रिपब्लिकन पार्टीचे खासदार मार्कवेयन म्यूलिन यांचं म्हणणं आहे की, ``या कागदपत्रांत तर काहीच तथ्य नाही. स्पीकरनी महाभियोगाची प्रक्रिया याच कागदपत्रांवर करायचं ठरवलं असेल, तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही आहे.''

फोटो स्रोत, Reuters
डेमोक्रॅट्स पक्षाने त्या फोनकॉलचा तपशील नीट पाहिलेला देखील नाही. हे माझ्याविरुद्धचं कारस्थान आहे असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर जे बोलणं झालं त्याचा तपशील जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने सरकारच्या एका वॉचडॉग यंत्रणेकडे तक्रार केली होती. ट्रंप यांनी विदेशी राष्ट्राध्यक्षांशी एका अंतर्गत मुद्यावरून चर्चा केली, असं तक्रारीचं स्वरुप होतं. विदेशी नेता म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की असल्याचं नंतर उघड झालं.इंटेलिजन्स इन्स्पेक्टर जनरल यांना व्हिसल ब्लोअरच्या तक्रारीत तथ्य आढळलं. त्यानुसार कारवाई करणं आवश्यक आहे यासाठी त्यांनी आवश्यक प्रक्रियेला सुरुवात केली. व्हिसल ब्लोअरच्या तक्रारीची प्रत संसदेत देण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅट्स पक्षाच्या खासदारांनी केली होती, मात्र व्हाईट हाऊस तसंच न्याय विभागाने प्रती देण्यास नकार दिला.ट्रंप आणि जेलेन्स्की यांच्यात 25 जुलै रोजी नेमकं काय बोलणं झालं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र डेमोक्रॅट्स पक्षाचा असा आरोप आहे की जो बिडेन आणि त्यांच्या मुलाची कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू व्हावी यासाठी ट्रंप यांनी जेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला. तसं न केल्यास युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्यात येईल अशी धमकी ट्रंप यांनी दिली, असा डेमोक्रॅट्सचा आरोप आहे.जेलेन्स्की यांच्याशी बिडेन यांच्याबाबत चर्चा केल्याचं ट्रंप यांनी मान्य केलं तसंच युक्रेनची लष्करी मदत रोखण्याचंही त्यांनी मान्य केलं जेणेकरून युरोपने मदतीसाठी पुढे यावं यासाठी असं वागल्याचं ट्रंप यांचं म्हणणं आहे. डेमोक्रॅट्स पक्षाने त्या फोनकॉलचा तपशील नीट पाहिलेला देखील नाही. हे माझ्याविरुद्धचं कारस्थान आहे असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर जे बोलणं झालं त्याचा तपशील जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















