लाहोर : सूफी दर्ग्याजवळ झालेल्या बॉंबस्फोटात आठ ठार, हल्लेखोरांनी केलं पोलिसांना लक्ष्य

फोटो स्रोत, Reuters
पाकिस्तानमधील लाहोर येथे सुफी पंथीयांच्या धार्मिक स्थळाजवळ घडविण्यात आलेल्या बाँब स्फोटामध्ये किमान आठ जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात 24 जण जखमी झाले आहेत.
दाता दरबार इथं झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पाच पोलिसांचाही समावेश आहे. किंबहुना या हल्ल्याचं मुख्य लक्ष्य पोलिस व्हॅनच असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हा आत्मघातकी हल्ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दाता दरबार हा सुफी संप्रदायाचा दक्षिण आशियातील सर्वांत जुना दर्गा आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी या दर्ग्याजवळ स्फोट झाला.
इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात हा स्फोट झाला आहे. पाकिस्तानी तालिबानचा एक भाग असलेल्या 'हिजबुल अहरार' या संघटनेनं स्फोटाची जबाबदारी घेतली आहे.

फोटो स्रोत, BBC Hindi
"हा हल्ला पोलिसांवर होता आणि पोलिसांच्या आजूबाजूला नागरिक नसतील ही काळजी घेऊनच हा हल्ला करण्यात आला होता," असं 'हिजबुल अहरार'चे प्रवक्ते अब्दुल अझीज युसुफजाई यांनी म्हटलं आहे.
हल्ल्यातील जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असं शहराच्या बचाव सेवेचे प्रवक्ते मुहम्मद फारूक यांनी म्हटलं आहे. शहरात 'हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तान रेडिओवर त्यांनी संदेश दिला. जखमींची योग्य काळजी घेतली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दाता दरबार हे सुफी पंथीयांचं महत्त्वाचं धार्मिक स्थळ मानलं जातं. रमजानच्या महिन्यात हजारो भाविक या स्थळाला भेट देतात.
याआधी देखील सुफी धार्मिक स्थळांवर हल्ले झाले आहेत.
दाता दरबार या धार्मिक स्थळाविषयी...
दाता दरबार हबा लाहोरमधील सगळ्यात जुन्या दर्ग्यांपैकी एक आहे.
तिथे अबुल हसन अली हजवैरी या सूफी संताची समाधी आहे. 11 व्या शतकात त्यांचं तिथे वास्तव्य होतं.
ते या भागातील अतिशय नावाजलेले संत मानले जातात.

ते अतिशय विद्वान होते. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं इंग्रजीसह अन्य भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहेत.
गेल्या अनेक शतकांपासून या स्थळाला हिंदू आणि मुस्लीम भाविक भेट देतात. त्यात मुस्लिमांची संख्या जास्त असली तरी सर्व धर्माचे लोक तिथे येतात.
2010मध्ये दाता दरबारवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 42 जण ठार तर 175 जण जखमी झाले होते.
काही वर्षांत पाकिस्तानी सरकारने दहशतवादविरोधी मोहीम सुरू केल्यानंतर अशा हल्ल्यांमध्ये घसरण झाली आहे. गेली दोन वर्षं लाहोरमध्ये कोणताही मोठा हल्ला झाला नव्हता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























