You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रग्रहणावेळी चंद्र लालसर का दिसेल? - व्हीडिओ
"Super blood wolf moon" या चंद्रग्रहणाविषयी कधी ऐकलंय? 20-21 जानेवारीच्या रात्री ते पृथ्वीच्या काही भागात दिसणार आहे.
वसाहतवादाच्या सुरुवातीला अमेरिकेत जानेवारीच्या पौर्णिमेला भुकेजलेले लांडगे आरोळ्या ठोकायचे. त्यावरून या पौर्णिमेच्या चंद्राला 'Wolf moon' असं नाव पडलं.
सूर्यकिरणांमधले काही रंग पृथ्वीवरून इतरत्र विखुरतात. पण जास्त तरंगलांबीमुळे लाल रंग चंद्रापर्यंत पोहोचतो. आणि या रंगामुळेच ग्रहणातला चंद्र लालसर दिसतो.
जर यावेळी चंद्र पृथ्वीजवळ आला असेल तर तो मोठा आणि प्रखर दिसतो.
आताचं चंद्रग्रहण हे उत्तर आणि दक्षिण अमेरिका, उत्तर युरोपचा काही भाग आणि उत्तर - पश्चिम आफ्रकेच्या किनाऱ्यावरून दिसणार आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)