हवेत इंधन भरताना अमेरिकी नौदलाच्या 2 विमानांना अपघात

फोटो स्रोत, III MEF Marines/Facebook
अमेरिकेन नौदलाच्या दोन विमानांचा गुरुवारी रात्री जपानजवळ हवेतच अपघात झाला आहे. त्यानंतर शोध आणि बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.
जपानच्या हिरोशिमा या ठिकाणावरून KC-130 आणि F/A 18 ही दोन विमानं अमेरिकेच्या 7 नौसैनिकांना घेऊन जात होती.
स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री 2 वाजता हा अपघात झाल्याचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
अमेरिकन मीडियानुसार नौदलाच्या विमानांना हवेतल्या हवेत इंधन भरताना हा अपघात झाला, असं म्हटलं आहे. पण अधिकृतरित्या असं जाहीर करण्यात आलेलं नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जपानच्या किनाऱ्यापासून 320 किमी दूर हा अपघात घडला. आतापर्यंत एका नौसैनिकाला वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती अमेरिकेच्या III Marine Expeditionary Force's' च्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात आली आहे.
हिरोशिमामधल्या इवाकुनी इथल्या नौदलाच्या तळापासून या विमानांनी हवेत झेप घेतली होती. दोन विमानांच्या नियमित प्रशिक्षणादरम्यान हा अपघात झाला आहे.

हवेतल्या हवेत इंधन भरण्यासाठी KC-130 या विमानाचा वापर होतो. तर McDonnell Douglas F/A-18 Hornet या लढाऊ विमानाची मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आणि बाँब घेऊन जाण्याची क्षमता आहे.
अमेरिकेचं 50 हजाराहून अधिक सैन्य जपानमध्ये तैनात आहे. त्यापैकी 18 हजाराहून जास्त नौसैनिक आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)