बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख...

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा? या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की, तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत...
1. हिंडनबर्ग रिपोर्टचा अदानी ग्रुपच्या धारावी प्रकल्पावर काय परिणाम होईल?
मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी असलेल्या हिंडेनबर्गने आपल्या एका रिसर्चमधून अदानी समूह "अकाउंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिपुलेशन आणि मनी लाँडरिंग" मध्ये गुंतल्याचे गंभीर आरोप केले होते.
या आरोपांमुळे समूहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने घसरल्या आणि तज्ञांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
आता महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे, या आरोपांमुळे अदानी समूहाला त्यांच्या अर्धवट आणि नव्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारणं शक्य होईल का?
2. भारताला भूकंपाचा किती धोका आहे? भूकंप आला, तर काय करायला हवं?

फोटो स्रोत, Reuters
24 तासांत सलग दोन शक्तीशाली भूकंप आल्यामुळे तुर्की हादरून गेलंय. शेजारच्या सीरियातील अलेप्पोसारख्या शहरांमध्येही मोठी जीवितहानी झाली आहे.
हजारो जण जखमी झाले आहेत कित्येक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारतासह अनेक देशांनी तुर्कीला मदत पाठवली आहे.
3. गुगलच्या बार्डने चुकीचं उत्तर दिलं आणि कंपनीचं झालं 100 अब्ज डॉलर्सचं नुकसान

फोटो स्रोत, Getty Images
गुगलने आणलेल्या आर्टिफिशियल बॉट बार्डने चुकीचं उत्तर दिल्यामुळे कंपनीला 100 अब्ज डॉलर्सचा भुर्दंड सोसावा लागला आहे.
अल्फाबेट या मूळ कंपनीचे समभाग 7 टक्क्यांनी घसरले आहेत आणि तिच्या बाजारमूल्यात 100 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे.
या बॉटच्या जाहिरातसाठी ट्वीटरवर एक जाहिरात केली होती. यामध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने लावलेल्या शोधांबद्दल 9 वर्षे वयाच्या मुलांना काय सांगावं असा प्रश्न विचारण्यात आला होता.
4. जहानाबाद: जेव्हा हजार माओवाद्यांनी तुरुंगावर हल्ला करून सोडवले होते शेकडो कैदी

फोटो स्रोत, SONY LIV
सध्या ओटीटीवर बिहार राज्याशी संबंधित 'जहानाबाद ऑफ लव्ह अँड वॉर' नावाची वेबसिरीज चर्चेत आहे. सुधीर मिश्रा यांची ही वेबसिरीज सोनी लिव्हवर रिलीज करण्यात आलीय.
'जहानाबाद ऑफ लव्ह अँड वॉर' सिरीज 2005 मध्ये घडलेल्या 'जहानाबाद जेलब्रेक'च्या घटनेवर आधारित आहे.
त्यावेळी आपल्या साथीदारांना बाहेर काढण्यासाठी जवळपास एक हजार माओवाद्यांनी मध्यरात्रीच्या अंधारात तुरुंगावरच हल्ला केला होता.
5. दत्तक गेल्यावर 58 वर्षांनी झाली खऱ्या आईची भेट

फोटो स्रोत, Timothy Welch
1960 च्या दशकांत दत्तक गेलेल्या हजारो मुलांपैकी टिमथी वेल्च हे एक आहेत.
टिमथी यांना दत्तक देण्यात आलं तेव्हा त्यांचं वय फक्त 6 आठवडेच होतं. जून मेरी फेल्प्स ही त्यांची आई. टिमथी यांच्या जन्माच्यावेळेस त्या फक्त 18 वर्षांच्या होत्या.
आता मॅनमाऊथ येथे राहाणाऱ्या आपल्या खऱ्या आईला म्हणजे जून यांना कसं शोधून काढलं?

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























