संभाजी भिडेंची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे नवी मागणी; टिपू सुलतान जयंतीला विरोध, #5मोठ्याबातम्या

संभाजी भिडे
फोटो कॅप्शन, संभाजी भिडे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. टिपू सुलतान जयंतीला विरोध, संभाजी भिडेंची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे नवी मागणी

टिपू सुलतान जयंतीवरून शिवप्रतिष्ठानने आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीसह महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान यांची जयंती साजरी करू नये, यासाठी प्रशासनाला संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

निवेदन देण्यासाठी शिवप्रतिष्ठानकडून मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र,पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली. त्यामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांसह संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन टिपू सुलतान यांच्या 20 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीला परवानगी देऊ नये, याबाबत निवेदन दिलं आहे.

निवेदन देण्यासाठी जाताना शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून वाहतुक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर संभाजी भिडे आणि काही कार्यकर्ते मोटरसायकलवरून जाताना विश्रामबाग याठिकाणी सिग्नल लागला असताना,शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सिग्नल तोडून गेल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये संभाजी भिडे गुरुजी हे देखील मोटरसायकलवर बसले होते, असंही बातमीत म्हटलं आहे.

2. मी दहशतवादी आहे का?- सुषमा अंधारेंचा सवाल

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आज जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. पण पोलिसांनी सुषमा अंधारे यांना सभास्थळी जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांची जळगावातील सभा रद्द झाली. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

सभास्थळी जाण्यासाठी सुषमा अंधारे गाडीत बसल्या असता, जवळपास 500 पोलिसांनी त्यांना अडवलं आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी स्वत: केला आहे.

सुषमा अंधारे

फोटो स्रोत, FACEBOOK

सुषमा अंधारे म्हणाल्या की, "सभास्थळी जाण्यासाठी मी गाडीत बसले. मात्र, पोलिसांनी मला परवानगी नाकारली. जवळपास पाचशे पोलिसांनी मला गराडा घातला. माझ्याविरोधात दबावतंत्रांचा वापर वापर केला जात आहे. गुलाबराव पाटील माझ्यासोबत एवढं सूडाचं राजकारण का करत आहेत? हे अद्याप मला समजलं नाही."

3. मुंबई दंगलीतील बेपत्ता लोकांचा अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबईत 1992-93च्या दंगलीत बेपत्ता झालेल्या 168 लोकांबद्दल सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला शुक्रवारी दिले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी. त्यात उपजिल्हाधिकारी दर्जाचा महसूली अधिकारी आणि साहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करावा.

तसंच राज्य सरकारनं या समितीला बेपत्ता 168 लोकांचा अहवाल त्यांचे नाव आणि पत्त्यासह समितीला सादर करावा, असंही न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे.

4. गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार - अमित शाह

गुजरातमध्ये आम्ही आमच्याच पक्षाचे पूर्वीचे विक्रम मोडून पुन्हा एकदा प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे.

अमित शाह

फोटो स्रोत, Twitter/BJP

अनेक संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला 131 ते 139 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

यावर बोलताना अमित शाह यांनी सांगितलं की, "गुजरातच्या लोकांमध्ये, तरुणांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि विशेषत: गुजरातच्या महिलांमध्ये विश्वासाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हे पाहता आम्ही निश्चितपणे आमचे सर्व विक्रम मोडीत काढू आणि बहुमताने सरकार स्थापन करू." एबीपी न्यूजनं ही बातमी दिलीय.

5. बीचवर बसून दारू पिल्यास 50,000 हजारांपर्यंत दंड

गोवा सरकारने समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छतेसाठी कठोर नियमांची घोषणा केली आहे. त्यानुसार, 31 ऑक्टोबरपासून गोव्याचा समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवणं आणि स्वयंपाक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दारू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

एवढंच नाही तर एखादी व्यक्ती किनाऱ्यावर दारू पिताना, बाटल्या फोडताना, कचरा करताना सापडली तर अशा व्यक्ती, ग्रुपवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना, ग्रुपला, आयोजकांना 5,000 ते 50,000 अथवा नियमानुसार जे योग्य असेल ती रक्कम दंड म्हणून जमा करावी लागेल.

टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)