लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुगा शरणरू इतके शक्तिशाली कसे बनले?

शिवमूर्ती मुरुगा शरणरू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवमूर्ती मुरुगा शरणरू
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसीसाठी, बंगळुरूहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

कर्नाटकातील सर्वात शक्तिशाली लिंगायत मठांपैकी एका मठाचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती मुरुगा शरणरू यांच्या अटकेमुळे लिंगायत समाजाला धक्का बसला आहे. कारण मुरुगा मठाने आर्थिकदृष्ट्या मागास लोकांच्या कल्याणाचं ट्रेंड सेट केलं होतं.

डॉ. शिवमूर्ती 17 व्या शताब्दीतल्या मठांना धार्मिक शाळांमध्ये बदलण्यासाठी ओळखले जातात. ख्रिश्चन शाळांप्रमाणे त्यांनी मठांचं एक क्लस्टर बनवलं, जे कर्नाटकमधील अनेक भागांमध्ये पसरलंय. विशेषत: उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये, जिथे लिंगायत समाजाचं वर्चस्व आहे.

बेळगावातील राणी चमन्ना विश्वविद्यापीठाचे राजशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख कामालाक्सी जी ताडापाड यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "या शाळांमधून बाहेर पडणारे लोक उत्तर कर्नाटक आणि राज्याच्या इतर भागात छोट्या मठांमध्ये काम करतात. छोट्या मठांमध्ये स्वामींना पाठवल्यानं अनुयायींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळते आणि राजकीय, तसंच सामाजिक मुद्द्यांवर प्रभाव वाढत जातं."

प्राध्यापक ताडापाड सांगतात, कर्नाटकात लिंगायत मठांच्या राजकीय भूमिकेला बरंच महत्त्व आहे. जर 2023 च्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशप्रमाणे कर्नाटकातील मठांच्या वाट्याला जागा आल्या, तर आश्चर्य वाटण्याची गोष्ट असणार आहे.

मठांची भूमिका

कर्नाटकच्या राजकारणात मठांची भूमिका नवी नाही. 'बास्वा'चे अभ्यासक रमजान दर्गा म्हणतात की, "राज्य पुनर्गठनानंतर लगेचच राजकीय नेत्यांनी मठांमध्ये बैठका घेण्यास सुरुवात केली होती की, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल. आणि राजकीय पक्ष त्यावेळी मठांच्या प्रमुखांचं म्हणणं मानायचे."

पन्नास आणि साठच्या दशकात एक काळ असा होता की, जेव्हा उच्च किंवा वर्चस्व असणाऱ्या जातींच्या लिंगायत आणि वोक्कालिगामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू असायची. लिंगायत समाजाचा दबदबा इतका वाढला होता की, वोक्कालिगा समाजानं आपले मठ बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर मागास आणि अतिमागास वर्गांनाही आपापले मठ बांधायला सुरुवात केली.

लिंगायत

फोटो स्रोत, GOPICHAND TANDLE

फोटो कॅप्शन, लिंगायत

डॉ. शिवमूर्ती हे लिंगायत समाजाच्या मठाचे असे पहिले प्रमुख आहेत, ज्यांच्यावर किशोरवयीन मुलींच्या लैंगिक छळाचा आरोप झाला आहे.

आरोप करणाऱ्या दोन्ही मुली मठाच्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहत होत्या. या प्रकरणात डॉ. शिवमूर्तींविरोधात एससी-एसटी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आलीय. कारण पीडित तरुणींपैकी एक अतिमागास वर्गातील आहे. शुक्रवारी (2 सप्टेंबर) डॉ. शिवमूर्तींना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं.

डॉ. शिवमूर्तींकडे लोक का जातात?

कर्नाटकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "सर्वात पहिली गोष्ट त्यांनी ही केली की, त्यांनी स्वत:ला जगदगुरू किंवा श्रेष्ठ म्हणवून घेतलं नाही. हा मोठा बदल होता. त्यांनी स्वत:ला शरणरू म्हणवून घेणं पसंत केलं, याचा अर्थ होतो ईश्वराचा सेवक किंवा मी सर्वांसमोर झुकतो. त्यांनी बसव सिद्धांताला केवळ मूलभूत रचना बनवून ठेवलं नाही, तर प्रॅक्टिकल पद्धतीनं लोकांसमोर नेण्यावर जोर दिला."

त्यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची लग्नं लावून दिली आणि सामाजिक कार्यांच्या मदतीने अनुयायांची संख्या वाढवली. त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मदत केली आणि हेच त्यांचं सर्वोत्तम काम मानलं जातं. ते बसव्वणांच्या दोषा संकल्पनेवर विश्वास ठेवतात. विशेषत: शिक्षण दोषवर."

मुरुगा मठ कर्नाटकात 150 हून अधिक आध्यात्मिक आणि शिक्षण संस्था चालवतं.

लिंगायत

फोटो स्रोत, GOPICHAND TANDLE

फोटो कॅप्शन, एक लिंगायत मठ

मोठ्या संख्येत शिक्षणसंस्था चालवणं लिंगायत समाजाचं वैशिष्ट्य आहे. ज्या पद्धतीनं ख्रिश्चन समाज शहरांमध्ये कॉन्व्हेंट शाळा चालवतात, त्याचप्रमाणे लिंगायत मठांबाबत म्हटलं जातं की, शहरी भागात येण्याआधी कर्नाटकच्या गावात कॉन्व्हेंट चालवत होते.

लिंगायत समाजाच्या प्रत्येक मठाने समाजाच्या लोकांशी बोलण्याची प्रक्रिया सुरू केली. याचा परिणाम असा झाला की, मठांशी मोठ्या प्रमाणात लोक जोडले जाऊ लागले. एकाने शिक्षणासोबत जेवण देणं सुरू केलं, तर दुसऱ्यानं शिक्षणासोबत पर्यावरण आणि प्राण्यांच्या हक्कांवर बोलण्यास सुरुवात केली होती. काही मठांमध्ये दारू आणि धुम्रपानाविरोधात अभियान चालवले जातात.

आणखी एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं की, "शिक्षण आणि समाजात लोकांची प्रगती करण्यास मदत करून मठानं आपला प्रभाव वाढवला. याच पद्धतीनं त्यांचा राजकीय दबदबाही वाढला."

राजकीय पक्षांमधील संघर्ष

डॉ. शिवमूर्ती हे लिंगायत मठांच्या इतर प्रमुखांपेक्षा वेगळे आहेत.

डॉ. शिवमूर्ती हे पहिले लिंगायत मठ प्रमुख आहेत, ज्यांनी एका प्रतिनिधीमंडळाचं समर्थन केलं होतं, ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांना जाहिरात दिली होती की, ज्यात लिंगायतला धर्म घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.

वीरशैव लिंगायत, जो इतर लिंगायतांच्या तुलनेत वैदिक रीतीरिवाजांमध्ये विश्वास ठेवतो, त्यांनी याचा जोरदार विरोध केला होता. हा मोठा वादाचा मुद्दा बनला होता. असंही मानलं जातं की, सिद्धारामैय्यांचा लिंगायतला धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचं मुख्य कारण बनलं होतं.

याच कारणामुळे काँग्रेसचे नेते या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत.

डॉ. शिवमूर्ति मुरुगा शरणरु

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉ. शिवमूर्ति मुरुगा शरणरु

1984 सालानंतर काँग्रेसला नुकसान झालं होतं, जेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी बंगळुरू विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, कर्नाटकात चार दिवसांच्या आत नवीन मुख्यमंत्री असेल.

ते मुख्यमंत्री विरेंद्र पाटील यांना बरखास्त करणार होते. काँग्रेस त्यानंतर लिंगायत समाजाचा विश्वास कधीच संपादन करू शकली नाही. मात्र, काँग्रेसच्या तिकिटावर अनेकदा लिंगायत समाजातील लोक आमदार बनले आहेत.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "खरंतर कायद्यानं आपलं काम केलं पाहिजे, असं म्हणणं वावगं ठरायला नको. पण मग आम्हाला हिंदूविरोधी पक्ष म्हटलं जाईल. मात्र, या प्रकरणातल्या पीडितांसाठी आम्हाला वाईट वाटतं."

माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसात एकाही भाजप नेत्याने स्वामीच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं नाही. स्पष्टपणे कुठलाच राजकीय पक्ष हे म्हणत नाहीय, कारण त्यांना राज्यातील प्रभावी जात समूहाला दुखावू इच्छित नाहीत. कर्नाटकात एकूण 224 विधानसभा जागा आहेत, ज्यातील उत्तर कर्नाटकातील 108 जागांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे.

कर्नाटकात आतापर्यंत लिंगायत समाजाचे 10 मुख्यमंत्री झाले, दुसऱ्या समाजांबद्दल बोलायचं झाल्यास, 6 वोक्कालिगा समाजाचे, 5 मागास समाजाचे आणि 2 ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री झालेत.

ज्या पद्धतीनं लिंगायत समाजानं काँग्रेसला 1984 पासून मत दिलं नाही, त्याचप्रमाणे 2013 साली भाजपचा पराभव झाला, कारण बीएस येडियुरप्पांना पक्षाच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आलं होतं.

येडियुरप्पांनी नंतर कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला आणि 12 टक्के मतं मिळवली. भाजप 40 जागांवर अडकली होती. त्यामुळे भाजपनं येडियुरप्पांना पुन्हा संसदीय मंडळात घेतलं आणि केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्यही बनवलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)