निशांक राठोड भोपाळ : 'सिर तन से जुदा,' फोनवर आलेल्या एका मेसेजमुळे खुनाचं रहस्य वाढलं

निशांक राठोड

फोटो स्रोत, VIRENDRA TIWARI

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मध्यप्रदेशच्या भोपाळमधून बीटेकचं शिक्षण घेतलेल्या निशांक राठोडच्या संशयास्पद मृत्यूभोवतीचं गूढ वाढतंच चालल्याचं दिसतंय.

निशांक राठोडचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला होता. त्यामुळे हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं सुरुवातीला वाटत होतं. पण निशांकच्या मोबाईलवरून त्यादिवशी आलेल्या एका मॅसेजने या प्रकरणातलं गूढ वाढलं.

निशांक राठोडच्या मोबाईलवरून त्या दिवशी त्याच्या वडिलांना एक मेसेज गेला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, 'नबी से गुस्ताख़ी नहीं. गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा...' अशाच प्रकारचा मेसेज त्याच्या मित्रांच्याही मोबाईलवर आला होता. या मेसेजमध्ये असं ही लिहिलं होतं की, राठोड साहेब तुमचा मुलगा खूप शूर होता.

यानंतर हे मेसेज नेमके कोणी केले याचा तपास सुरू झाला.

आत्महत्येचं प्रकरण?

भोपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या सिवनी माळवाचा रहिवासी असलेला 20 वर्षांचा निशांक राठोड हा भोपाळच्या ओरिएंटल कॉलेजमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता. ही आत्महत्या असावी असा निष्कर्ष पोलिसांनी प्राथमिक तपासात काढला होता. मात्र पोलीस आता इतर बाबींचाही तपास करत आहेत.

निशांक रविवारी (24 जुलै) बेपत्ता झाला होता. त्याच्या मेसेजमुळे त्याचे कुटुंबीय त्याला सतत फोन करत होते पण तो उचलत नव्हता. त्याच्याशी बोलणं होत नसल्यामुळे कुटुंबीय भोपाळला जाण्यासाठी निघालं.

निशांक राठोड

फोटो स्रोत, VIRENDRA TIWARI

याचदरम्यान पोलिसांनी निशांकचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी बारखेडाजवळ त्याचं लोकेशन ट्रॅक केलं. यानंतर काही वेळातच बारखेडा रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. तो निशांकचा होता. त्याचवेळी घटनास्थळापासून काही अंतरावर निशांकचा मोबाईल आणि स्कूटी पडली होती ती ताब्यात घेण्यात आली.

पोलिसांच्या तपासाची चक्र फिरायला सुरू झाली

या प्रकरणी पोलिसांना अद्याप स्पष्टपणे सांगता आलेलं नाही. प्रकरणाचा तपास करून सर्व तथ्य समोर आल्यानंतरच याबद्दल काही सांगता येईल असं पोलिसांच म्हणणं आहे. पोलीस याप्रकरणाच्या सर्व बाजू तपासत आहेत.

पोलिसांना अजून तरी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

घटनेच्या तासाभरापूर्वी निशांक जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असल्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे.

अंत्ययात्रा

फोटो स्रोत, VIRENDRA TIWARI

त्यावेळी तो एकटाच असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. त्याच्या मागावर कोणी होतं का किंवा त्याचा कोणी पाठलाग करत आहे का यासाठी पोलिसांनी याआधीचेही सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र यातून काहीच समोर आलं नाही

निशांकने पेट्रोल पंपावर 450 रुपयांचं पेट्रोल भरल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलयं.

रायसेनचे एसपी विकास सहवाल म्हणाले की, "ट्रेनच्या धडकेत निशांकचा मृत्यू झाल्याचं शॉर्ट पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे."

रायसेनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अवधेश प्रताप सिंह यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलंय.

ते म्हणाले, "सध्या सर्व शक्यतांची पडताळणी सुरू आहे. यातून जे काही समोर येईल ते तपासाअंतीच समजेल.

'माझा मुलगा आत्महत्या करणार नाही'

दुसरीकडे, निशांकचे वडील उमाशंकर राठोड म्हणतात की त्यांचा मुलगा आत्महत्या करणाऱ्यातला नाही.

ते म्हणाले, "तो मॅसेज आल्यावर मी अस्वस्थ झालो. आणि त्यानंतर त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण आमचं बोलणंच झालं नाही. तो मला मॅसेजवर राठोडसाहेब का म्हणेल?"

ते पुढे म्हणाले की, हा मॅसेज त्याच्या फोनवरून कोणीतरी पाठवला असावा.

त्याचवेळी सिवनी माळवा पोलिसांकडून खबरदारी घेतली जातेय. शहरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. लोक या संपूर्ण घटनेला उदयपूरच्या घटनेशी जोडू पाहत आहेत.

निशांकवर सिवनी माळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निशंकला दोन बहिणी असून त्याच्या आईचं याआधीच निधन झालं आहे.

दोन्ही बहिणींनी निशांकच्या मनगटावर राखी बांधून त्याला शेवटचा निरोप दिला. त्याच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)