या आठवड्यात बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या पाच बातम्या ज्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत

सम्राट पृथ्वीराज

फोटो स्रोत, YRF

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

या आठवड्यात बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या पाच बातम्या ज्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा? या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल. बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.

1) अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप होण्याची 3 कारणं...

मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः सपाटून आपटला. तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट या वर्षातला एक मोठा फ्लॉप चित्रपट ठरू शकतो.

एवढा व्याप करूनही चित्रपट काही चालला नाही.

अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता.

चित्रपट टॅक्स फ्रीही करण्यात आला होता. आता एवढं करून सुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर का आपटला? कारणं जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचायला हवी.

2) मिताली राज : भरतनाट्यमपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंतचा प्रवास?

भारतीय महिला क्रिकेटला खेळाडू आणि कर्णधार म्हणून मोलाचं योगदान देणाऱ्या मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

मिताली राज

फोटो स्रोत, HARRY TRUMP-ICC

फोटो कॅप्शन, मिताली राज

39 वर्षीय मितालीने 12 टेस्ट, 232 वनडे आणि 89 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. महिला क्रिकेटमधील सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये मितालीची गणना होते. भारतीय महिला संघाची कर्णधार म्हणून मितालीचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने शनिवारी (3 जुलै) शिरपेचात दोन विक्रमी मानाचे तुरे खोवले. महिला क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम आता मितालीच्या नावावर आहे.

मितालीचा प्रवास रोमहर्षक आणि तितकाच प्रेरणादायी आहे. मितालीचा प्रवास जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

3) भारतीय तरुणांना क्रिप्टो करन्सीची भुरळ का पडतेय?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन हे गुंतवणुकीचं सगळ्यांत नवीन साधन आहे. विशेषत: तरुण मंडळी त्याकडे आकर्षित झालेली दिसतेय.

व्हीडिओ कॅप्शन, भारतीय तरुणांना क्रिप्टो करन्सीची भुरळ का पडतेय?

मोबाईल अॅपमध्येही ट्रेडिंगची सोय, 24 तास सुरू असलेला आंतरराष्ट्रीय बाजार यामुळे भारतीयांची या अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक वाढतेय.

4) नुपूर शर्मा प्रकरण: भारताने मुस्लीम देशांच्या दबावापुढे नमतं का घेतलं?

टीव्ही चॅनल्सच्या डिबेटमध्ये हिंदू-मुस्लीम वाद काही नवीन राहिलेले नाहीत. पण नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदल या दोन भाजप प्रवक्त्यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वक्तव्यं केली आणि त्यानंतर अरब देशांमध्ये तीव्र भारत-विरोधी प्रतिक्रिया उमटली. या सगळ्यामुळे सध्या वातावरण तापलेलं आहे.

या दोघांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. पण प्रश्न इथे संपत नाहीत.

नुपूर शर्मा

फोटो स्रोत, TWITTER/NUPURSHARMABJP

भाजपच्या प्रवक्त्यांमुळे भारत सरकारवर माफी मागायची पाळी का आली? आपल्याच प्रवक्त्यांना भाजप फ्रिंज इलिमेंट्स कसं काय म्हणतो? आणि सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न - अरब देशांच्या दबावामुळे नरेंद्र मोदी सरकारनं कारवाई केली, मग देशांतर्गत तक्रारींकडे लक्ष का दिलं नाही?

5) गुप्ता ब्रदर्स कोण आहेत? त्यांचा भारताशी काय संबंध?

दक्षिण अफ्रिकेतील प्रसिद्ध उद्योगपती राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता यांना सोमवारी (6 जून) यूएईमध्ये अटक करण्यात आली. गुप्ता कुटुंबाला आफ्रिकेमध्ये गुप्ता ब्रदर्स नावाने ओळखलं जातं.

दक्षिण अफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक, राजकीय प्रभावाचा गैरवापर, नफेखोरी आणि भ्रष्टाचाराचा आरोप गुप्ता यांच्यावर आहेत. जेकब झुमा आणि गुप्ता यांनी अनेकवेळा या आरोपांचं खंडन केलंय.

गुप्ता ब्रदर्स

फोटो स्रोत, GALLO IMAGES

दक्षिण आफ्रिकेच्या जस्टीस आणि करेक्शनल सर्व्हिसेस मंत्रालयाने गुप्ता बंधुंना अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी दक्षिण अफ्रिका प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

या गुप्ता बंधूंबद्दल अनेकांना उत्सुकता निर्माण झालीय. तर त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)