UIDAI : आधार कार्डाची मास्क्ड प्रत वापरण्याचा सल्ला का दिला आहे?

आधार, परिचयपत्र, नागरिकता
फोटो कॅप्शन, आधार
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आपलं आधार कार्ड किंवा त्याची फोटोकॉपी कोणत्याही विनापरवाना खाजगी संस्थेत शेअर करू नये म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) शुक्रवारी एक नियमावली प्रसिद्ध केली होती. मात्र प्राधिकारण्याच्या या नियमावलीवर वादंग निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने आज त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. आपली आधार विषयीची भूमिका कायम आहे, पण, होऊ घातलेला विरोध बघता नियमावली आम्ही मागे घेतोय, असं क्रेंद्रसरकारने म्हटलंय.

इतकंच नाही तर आधार कार्डामधील माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून मूळ ओळखपत्रज्ञाऐवजी त्याची मास्क्ड प्रत वापरण्याचा सल्ला दिला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) दिनांक 27 मे, शुक्रवारी आधारकार्ड संबंधी नवी नियमावली प्रसिद्ध केली होती.

नागरिकांनी ओरिजिनल आधार कार्ड ऐवजी त्यांच्या मास्क आधार कार्डचा वापर करावा असा सल्ला प्राधिकरणाकडून देण्यात आला होता.

या नियमावलीत कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या?

1. आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून लोकांनी आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये. त्याऐवजी तुम्ही मास्क आधार कार्ड वापरू शकता. तुमचा पूर्ण 12 अंकी आधार क्रमांक मास्क आधार कार्डमध्ये दिसत नाही. त्याऐवजी आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक दिसतात. हे मास्क आधार ऑनलाइन देखील मिळवता येतं.

2. प्राधिकरणाने म्हटलं आहे की, कोणत्याही आधार क्रमांकाची सत्यता पडताळण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar वर भेट देता येईल. तसेच ऑफलाइन पडताळणीसाठी तुम्ही mAadhaar मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये QR कोड स्कॅनर वापरून ई-आधार किंवा आधारकार्ड किंवा आधार पीव्हीसी कार्डवरील QR कोड स्कॅन करू शकता.

3. सरकारने लोकांना चेतावणी देतं म्हटलं आहे की, त्यांनी सार्वजनिक कॉम्प्युटर किंवा सायबर कॅफेमधून आधारची प्रत डाउनलोड करू नये. तसं केल्यास, डाउनलोड केलेल्या आधारच्या प्रती पर्मनंट डिलीट झाल्या आहेत याची खात्री करा.

4. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या नियमावलीत हे ही स्पष्ट केलं आहे की, विनापरवाना खाजगी संस्था तुमचे आधारकार्ड मागू किंवा ठेवू शकत नाहीत. यामध्ये विनापरवाना हॉटेल्स आणि सिनेमा हॉलचा ही समावेश करण्यात आला आहे.

आधार, परिचयपत्र, नागरिकता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आधारचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोरही चर्चेत आला होता.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून आधारसाठी युजर लायसन्स घेतलं असेल अशाच खाजगी संस्था तुमच्या आधार कार्डची प्रत मागू शकतात.

प्राधिकारण्याच्या या नियमावलीवर ओवेसींची टीका

एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारच्या आधार कार्डबाबतच्या धोरणांवर टीका केली आहे. लोकांना त्रास देण्यासाठी आणि त्यांचा जीव घेण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जात असल्याचं ओवेसींनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

ओवेसी आपल्या दुसऱ्या एका ट्विट मध्ये म्हणतात, भाजपच्या माजी नगरसेवकाने मुस्लिम असल्याच्या संशयावरून आणि आधारकार्ड दाखवू शकत नसल्यामुळे भंवरलाल जैन या अपंग व्यक्तीची हत्या केली. अशी आणखी अनेक उदाहरणे आहेत जिथे आधारकार्ड लोकांसाठी घातक ठरलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

या नियमावलीवरून सरकारचे घुमजाव

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकारण्याच्या या नियमावलीवरून वादंग होण्याची चिन्ह निर्माण होताच केंद्र सरकारने आज रविवारी त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

"प्राधिकारण्याच्या नियमावलीचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता लक्षात घेता, तीच भूमिका ठेवतं प्रसिद्धपत्रक तात्काळ मागे घेण्यात येत आहे," असं सरकारच्या आजच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

"UIDAI जारी केलेल्या आधारकार्ड धारकांना त्यांचा UIDAI आधार क्रमांक वापरताना आणि शेअर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आधार ओळख प्राधिकरणाने आधार धारकाची ओळख आणि गोपनीयता बाळगण्याची पुरेशी सुविधा प्रदान केली आहे." असं ही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय?

मास्क्ड आधार कार्डावर तुमच्या आधार क्रमांकाचे पहिले आठ अंक गुप्त असतात. फक्त शेवटचे चार दिसतात. त्यामुळे तुमचं नाव, पत्ता आणि जन्मतारीख एवढीच माहिती कळू शकेल. बायोमेट्रिक माहिती गुप्त राहील. आणि परिणामी, तुमच्या माहितीचा गैरवापर टळेल, असं प्राधिकरणाचं म्हणणं आहे. आधारच्या वेबसाईटवर मास्क्ड कार्ड तुम्हाला मिळू शकेल.

Uidai.gov.in या वेबसाईटवर जा.

तिथं download aadhar हा पर्याय निवडा

त्यात पुढे Do you want a masked Aadhaar असा पर्याय मिळतो. त्या पर्यायावर क्लिक केलं की मास्क्ड कॉपी डाऊनलोड होते.

अर्थविषयक अभ्यासक उदय पिंगळे यांनी मास्क्ड आधारकार्डाविषयी बीबीसी मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

"आपल्या ओळखपत्रातील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळजी आपण स्वत: घ्यायला हवी. त्यातली एक म्हणजे मूळ आधार कार्डाऐवडी मास्क्ड प्रत बरोबर ठेवणं. वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. आणि दुसरं म्हणजे सरकारच्या डिजिलॉकर सुविधेतही आपल्याला मास्क्ड प्रतच मिळते. म्हणजे तिथेही पहिले आठ अंक गुप्त असतात. तुमचा आधार क्रमांक गुप्त राहिला तर त्याचा गैरवापर टळतो. त्या दृष्टीने मास्क्ड प्रत बाळगणं योग्य आहे."

आणखी एक मुद्दा पिंगळे यांनी सांगितला तो आधारच्या व्हेरिफिकेशनचा. "आधार क्रमांक आणि त्यातील माहिती फोनवर तपासता येते. ओटीपीच्या मदतीने हे शक्य आहे. त्यामुळे खाजगी संस्थांनी तशी मागणी केल्यास त्यांना ओटीपी किंवा मोबाईल अॅपच्या मदतीने ही माहिती प्रमाणित करायला सांगावे. ग्राहकांवर आधारची सक्ती किंवा ती जोडण्यासाठी कुणीही दबाव आणू शकत नाही."

खरंतर 2009 मध्ये आधार कार्डाची संकल्पना आली तेव्हापासून आधारमधील माहितीची सुरक्षा आणि गोपनीयता यावरून भरपूर वाद झाले आहेत. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टेलिफोन कंपन्या, बँका किंवा हॉटेल, मॉल यासारख्या खाजगी संस्था तुमच्या आधारवरची माहिती इतरांना देऊ शकत नाहीत असा निर्वाळा देत माहिती इतरांना देणं हा गुन्हा ठरवला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)