जिल्ह्याला आंबेडकरांचं नाव द्यायला विरोध, मंत्र्यांचं घर पेटवलं, 20 जण जखमी

कोनसीमा
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आंध्रप्रदेशातल्या कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याविरोधात कोनासीमा जिल्ह्याच्या अमलापूरम् शहरात मंगळवारी (24 मे) मोठा हिंसाचार झाला.

आंदोलकांनी अमलापूरमचे आमदार आणि वाहतूक मंत्री पानीपे विश्वरूप यांचं घर पेटवून दिलं आहे. हा प्रकार घडण्याआधी पोलिसांनी मंत्र्यांच्या कुटुंबियांची सुखरूप सुटका केली आहे.

मन्निदिवरमचे आमदार सतिश यांच्या घरावरसुद्धा हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी 3 बसेससुद्धा जाळल्या आहेत.

अमलापूरम हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे.

कोनसीमा

आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत 20 पोलीस जखमी झाले आहेत.

कोनासीमा जिल्हा सधन समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे.

आंध्र प्रदेश सरकारनं कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं प्राथमिक नोटीफिकेशन काढलं आहे. आंदोलकांची मागणी आहे की, त्यांच्या जिल्ह्याच्या नावात कुठल्याही इतर नावाचा सामावेश केला जाऊ नये.

महत्त्वाचं म्हणजे कोनसीमा जिल्ह्याची स्थापना गेल्याच महिन्यात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सरकारनं त्यांच्या 13 जिल्ह्यांचं विभाजन करून 26 जिल्हे तयार केले आहेत.

कोनसीमा

आंदोलकांनी इशारा दिल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात कडक बंदोबस्त लावला होता. जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं होतं. पण दुपारी तीननंतर मात्र आंदोलन हाताबाहेर गेलं. आंदोलकांनी बॅरिकेड तोडून जाळपोळ सुरू केली.

त्यावेळी आंदोलक 'जय कोनासीमा' अशा घोषणा देत होते. आंदोलकांचा रेटा एवढा होता की, पोलिसांना त्यांना नियंत्रणात आणता आलं नाही.

आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारसुद्धा करावा लागला. मुख्यतः आंदोलक हे तरूण आहेत.

आंदोलकांच्या दडगफेकीत 20 पोलीस जखमी झाल्याचं गृहमंत्री टी. वनिता यांनी सांगितलं आहे.

सरकारनं घेतलेल्या निर्णायचं स्वागत करा आणि आंबेडकराचं नाव जिल्ह्याला मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे, असंसुद्धा टी. वनिता यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana61566568, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)