नातवंड पाहिजे, नाहीतर 5 कोटी द्या... आईवडिलांची मुलगा-सुनेकडे अजब मागणी

आम्हाला नातवंड पाहिजे, नाहीतर 5 कोटी... आईवडिलांची मुलगा-सुनेकडेच अजब मागणी

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आपला वंश चालला नाहीतर काय होईल अशी नाहक शंका आजही अनेक लोकांच्या मनात घोळत राहाते. समाजातला कथित दर्जा, परंपरा या नावाखाली बहुतांशवेळा मूल होण्यासाठी चित्रविचित्र उपाय केले जातात. अनेक गुन्हेही यामुळे घडतात. पण आता एका आजी-आजोबांनी आपल्याच मुलगा-सुनेला कोर्टात खेचलं आहे.

उत्तराखंडात हरिद्वार इथं राहणाऱ्या एस. आर प्रसाद आणि त्यांच्या पत्नीने आपल्याच मुलाविरुद्ध कोर्टाची पायरी चढली आहे. 2016 साली त्यांच्या मुलाचे लग्न झाले. मात्र अजूनही नातवंडाचे तोंड पाहायला न मिळाल्याने हे दोघे संतप्त झाले आणि त्यांनी तक्रार केली. आम्हाला नातू होवो किंवा नात आम्हाला फक्त नातवंड पाहिजे. मुलगा-मुलगी असा भेद नाही, असं हे एस. आर. प्रसाद म्हणत आहेत.

आम्हाला नातवंड पाहिजे, नाहीतर 5 कोटी... आईवडिलांची मुलगा-सुनेकडेच अजब मागणी

फोटो स्रोत, ANI

एस. आर प्रसाद सांगतात, मी माझे सगळे पैसे माझ्या मुलाला दिले. त्याला अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी पैसे दिले. घर बांधण्यासाठी आम्ही कर्ज काढलंय. आम्ही व्यक्तिगत आणि आर्थिकदृष्ट्या अडचणित आहोत. म्हणून आम्ही मुलगा आणि सुनेकडून प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मागितले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

याबद्दल बोलताना वकील ए. के श्रीवास्तव म्हणाले, हा खटला आपल्या समाजाचं वास्तव दाखवतो. आपण मुलांमध्ये सर्व गुंतवणूक करतो. त्यांना चांगल्या जागी नोकरी करता यावी यासाठी सक्षम बनवतो. पालकांची आर्थिक बाबतीतील काळजी घेण्याची जबाबदारी मुलांची असते.. या दोघांनी एका वर्षात नातवंड मिळावे अशी अपेक्षा केली आहे तसे न झाल्यास त्यांनी 5 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)