LPG सिलेंडर 50 रुपयांनी महाग, पंधरा दिवसात दुसऱ्यांदा भाववाढ

भारत-चीन सीमा वादा

फोटो स्रोत, EPA

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

सर्वसामान्य जनतेला आता महागाईचा चटका अधिक सोसावा लागणार आहे.कारण घरगुती सिलेंडरचे भाव 50 रुपयांनी महाग झाले आहेत.

शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 50 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.

त्यामुळे आता 14.2 किलोचं एक सिलेंडर 999.50 रुपये म्हणजेच जवळपास 1000 रुपयांना मिळणार आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर यावर राजकीय स्तरावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, "देशात महागाई इतकी वाढलीय की त्यावर कुणी केंद्रातला नेता बोलत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत. पण इथं देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे.

"पेट्रोल, डिझेल, सिलिंडर यासंदर्भात भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का? भोंग्यांवर कसले बोलता. महागाईवर बोला. भोंग्यांवर बोलणं तुमचं कर्तव्य नाही, महागाईवर बोलणं तुमचं कर्तव्य आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

घरगुती सिलेंडरचा दर हजार रुपयांपेक्षा अधिक करण्यात आला आहे. हे म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. उत्पन्न आणि बचतीवर महागाईचं ग्रहण लावत भाजप सरकार देशातल्या नागरिकांचा लुटायचं काम करत आहे, असं काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

काँग्रेसचं सरकार असताना 400 रुपयांमध्ये मिळणारं घरगुती सिलेंडर आता मोदींच्या सरकारमध्ये 1 हजार रुपयांना मिळत आहे, असं काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सोशल मीडियावर सामान्य लोकही प्रतिक्रिया देत आहेत.

आसुरी नावाच्या ट्विटर हँडलवर लिहिलंय की, "2013 मध्ये 1300 रुपयांचं सिलेंडर विकणाऱ्यांना 999 रुपये जास्त वाटत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

तर विनोद पानवर यांनी ट्विट करत म्हटलंय, "महागाईचा एक ऐतिहासिक उच्चांक. घरगुती सिलेंडर पहिल्यांदाच 1 हजार पार. असं असलं तरी सध्या हिंदू-मुस्लीम वादच महत्त्वाचा ठरणार."

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

दरम्यान, मार्च 2022मध्ये सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

त्यानंतर त्याची किंमत 2253 रुपये करण्यात आली होती.

सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)