मागील आठवड्यातले खास लेख, जे कदाचित तुमच्या नजरेतून सुटले असतील

एलआयसी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल. बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.

1. अर्थ-व्यापार - एलआयसीचा शेअर घेणं फायद्याचं की तोट्याचं?

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी आला. 9 मे पर्यंत तुम्ही हा आयपीओ विकत घेऊ शकणार आहात. पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल आयपीओ म्हणजे काय, कशासाठी हा असतो, त्याचा फायदा काय, कुठून विकत घेतात, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.

एलआयसी

फोटो स्रोत, EPA

तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तर या लेखात मिळतीलच पण एलआयसी विषयी अनेक गोष्टी तुम्हाला या बातमीत वाचायला मिळतील ज्यामुळे तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडेल.

2. दक्षिण मुंबईत पहाटेची अजान भोंग्यांशिवाय, मशिद ट्रस्टी, मौलवींचा निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दक्षिण मुंबईतील मशिद ट्रस्टी आणि मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांशिवाय देण्याचा निर्णय घेतला. ही या आठवड्यातील महत्त्वाची बातमी आहे.

राज ठाकरे

काल (4 मे) दक्षिण मुंबईतील 26 मशिदींतील ट्रस्टी आणि मौलवी यांची एक बैठक झाली. सर्वांनी एकमताने हा निर्णय मंजूर केल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उप-मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कुणीही कायदा हातात घेऊ नये. कुणालाही अल्टिमेटम देण्याचा अधिकार नाही."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भात 4 मेचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर या निमित्ताने वातावरण तापलेलं दिसून आलं होतं.

3. WWE : वीर महान कोण आहे? WWE मध्ये त्याच्या एंट्रीमुळे खळबळ का माजली?

एक काळ होता. भारतात त्यावेळी क्रिकेटसोबतच WWE किंवा प्रचलित भाषेत WWF हा शो प्रचंड लोकप्रिय होता.

वीर महान कोण आहे आणि त्याचा प्रवास कसा झाला?

वीर महान

फोटो स्रोत, Twitter/Veer Mahan

अंडरटेकर, केन, जॉन सिना, द रॉक यांच्यासारखे मोठमोठे सुपरस्टार त्यावेळी WWE मध्ये होते. पुढे भारताचा पहिला पैलवान म्हणून 'द ग्रेट खली' याने WWE मध्ये लोकांचं लक्ष वेधून घेतलं. या यादीत आता 'वीर महान' या नव्या दमाच्या पैलवानाचाही समावेश झाला आहे.

या निमित्ताने वीर महानची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसून येतं. WWE मध्ये प्रवेश केल्यापासून वीर महानचा अस्सल भारतीय लूक, त्याची स्टाईल यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

4. कोरोनाची चौथी लाट येईल की नाही याबद्दल टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित काय म्हणाले?

मुंबईत कोव्हिड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सने बंदिस्त सभागृहात मास्क वापरण्याची सूचना केलीये. टास्कफोर्सने याबाबत राज्य सरकारला शिफारसही केलीये. बीबीसी मराठीने टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांची मुलाखत घेतली.

कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल राहुल पंडित काय म्हणाले?

डॉ. राहुल पंडित

महाराष्ट्रात राज्य सरकारने मास्कसक्ती हटवली आहे. मास्क वापरणं ऐच्छिक करण्यात आलंय. तज्ज्ञ म्हणतात, कोरोना व्हायरस सतत बदलतोय. त्यामुळे, मास्क संसर्गापासून बचावाचं एकमेव शस्त्र आहे.

दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या हजारापार पोहोचलीये. तर, मुंबईत 57 दिवसानंतर रुग्णसंख्या शंभरीपार पोहोचली आहे. त्यामुळे, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीये.

5. Electric Scooters पेटण्याच्या घटना वाढतायेत, यावर कंपन्यांचं काय म्हणणं आहे?

पुण्यात 26 मार्च रोजी एका ग्राहकाच्या नवीन गाडीला गाडी उभी केल्यानंतर अचानक आग लागल्याची घटना प्रसिद्ध झाली होती. यासारख्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. त्यावर कंपन्यांचं काय म्हणणं आहे.

बीबीसीच्या टीमने ओलाच्या प्लांटला भेट देऊन ही बातमी केली.

ओला

फोटो स्रोत, Getty Images

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक भाविश अगरवाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की "या सर्व स्कूटर्सची आमच्या सर्व्हिस इंजिनिअरकडून तपासणी केली जाईल आणि सर्व बॅटरी सिस्टम, थर्मल सिस्टीम तसेच सिक्युरिटी सिस्टीममध्ये योग्य निदान केले जाईल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)