रामदेवबाबा: 'हो, बोललो होतो स्वस्त पेट्रोल पाहिजे, काय करायचं ते करून घे'

फोटो स्रोत, Ani
योग गुरू रामदेव बाबा यांच्या एका व्हीडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या व्हीडिओमध्ये रामदेव बाबांना एक पत्रकार प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी रामदेव बाबा भडकले आणि पत्रकारालाच धमकावू लागले.
हरियाणाच्या कर्नालमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पत्रकाराने रामदेव बाबांना त्यांच्या एका जुन्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण मागितलं होतं.
बाबा रामदेव यांनी युपीए-2 सरकारच्या काळात म्हटलं होतं की देशात पेट्रोल 40 रुपये लीटर आणि गॅस सिलेंडर 300 रुपयांना मिळायला हवं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
नेमका याच वक्तव्याचा उल्लेख करून पत्रकाराने रामदेव बाबांना प्रश्न विचारला. पण उत्तर देण्याऐवजी रामदेव यांचा भडका उडाला.
रामदेव बाबा काय म्हणाले?
कर्नाल येथील कार्यक्रमात रामदेव हे महागाईविषयी बोलत होते. लोकांनी अधिक मेहनत करावी, असा ते सल्ला देत होते.
ते म्हणाले, "तेलाचा दर कमी असेल तर टॅक्स मिळणार नाही, असं सरकार म्हणतं. टॅक्सच मिळाला नाही, तर देश कसा चालणार? लष्कराला कुठून पैसे मिळतील? रस्ते-विमानतळं कशी बनतील?"
"महागाई कमी पाहिजे असेल, तर आपण मेहनत जास्त करण्याची गरज आहे. मी संन्यासी असून 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करतो. मग माझी कुठली मुलं-मुली भुकेने तडफडत आहेत?"

फोटो स्रोत, Ani
यानंतर पत्रकाराने त्यांना वरील प्रश्न विचारला. देशाच्या तरुणांना 40 रुपये दराने पेट्रोल आणि 300 रुपये दराने सिलेंडर हवं आहे.
या प्रश्नावरून योग गुरू रामदेव भडकले. सुरुवातीला त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण पत्रकाराने हा प्रश्न लावून धरल्यानंतर ते म्हणाले, "हो मी म्हटलं होतं, मग तू आता काय करशील? तू काय कोणता ठेकेदार लागून गेला का? मी तुझं उत्तर का देऊ? थोडं सभ्यपणे वाग."
रामदेव बाबांनी असं उत्तर दिलं तरी पत्रकार आपल्या प्रश्नावर अडून होता. त्याने पुन्हा बाबांना स्पष्टीकरण मागितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तेव्हा ते म्हणाले, "मी तेव्हा बोललो होतो. पण आता नाही बोलणार. काय करायचं ते करून घे. आता गप्प बस. जास्त बोललास तर याद राख. इतका उन्माद करू नये, तू सभ्य आई-वडिलांचा मुलगा आहेस, हे लक्षात ठेव."
या प्रकाराचा व्हीडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ट्वीटरवर हंसराज मीणा यांनी म्हटलं, "2014 पूर्वी रामदेव बाबा थाटात भाजपसाठी प्रचार करायचे."
काही लोकांनी ट्वीटरवर पतंजलि उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. योग गुरू रामदेव हे पतंजलिचे ब्रँड अँम्बेसिडर आहेत.
नवव्यांदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ
देशात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होण्याचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी सलग दहाव्या दिवशी नवव्यांदा भाववाढ झाली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली. यानंतर गेल्या 10 दिवसांत तेलाचे भाव 6.40 रुपये प्रतिलीटरने वाढले.
दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 101.81 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचे दर 93.07 प्रतिलीटर झाले आहेत.
तर मुंबईत पेट्रोलचा दर यापेक्षा जास्त आहे. मुंबईत पेट्रोल 116.72 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 100.94 रुपये प्रतिलीटर दराने मिळतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)