नरेंद्र मोदी : 'भाजपला बळकट करण्यासाठी, भारताला भक्कम बनवण्यासाठी योगदान द्या', #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. पंतप्रधानांनी भाजपला दिली 1 हजाराची देणगी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला 1000 रुपयांची देणगी दिली आहे. ट्विटरवर त्यांनी याची पावतीदे शेअर करत माहिती दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

"भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रहित नेहमीच सर्वोच्च स्थानी राहिलं आहे आणि त्याच मार्गाने आम्ही पुढे जात आहोत. आमचे कार्यकर्ते निस्वार्थी भावनेने आजीवन सेवाकार्य करत आहेत.

"तुमचं छोटंसं दान या सेवाकार्याला बळकटी देण्याचे काम करेल. भाजपला बळकट करण्यासाठी, देशाला भक्कम बनवण्यासाठी योगदान द्या'" असं ट्विट मोदींनी केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पंतप्रधान मोदींबरोबरच अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनीही देणगी दिली आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने निधी उभारण्याचा उपक्रम पक्षानं हाती घेतला आहे. त्यासाठी या सर्वांनी देणगी दिली आहे.

2. 'शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या हुकूमशाही सरकारला जनशक्तीने झुकवले'

चर्चेविनाच कृषी कायदे मंजूर करून सरकारनं शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जनशक्तीसमोर या हुकूमशाही सरकारला झुकावं लागलं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. लोकमतनं याबाबचं वृत्त दिलं आहे.

सध्याच्या काळात नैसर्गिक आपत्तींमुळं शेतीचा धंदा परवडत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची स्थिती बदलायची असेल तर शेतीचं अर्थकारण बदलण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

सहकार महर्षी साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी पवारांनी विविध विषयांवर मतं मांडली.

भविष्यामध्ये जर रोजगार मिळवायचा असेल तर पारंपरिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचंही ते म्हणाले.

3. काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून नितीन राऊत यांची गच्छंती

काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेस पत्राच्या एससी (अनुसुचित जाती) विभागाच्या अध्यक्ष पदावरून पायऊतार करण्यात आलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

माजी आमदार राजेश लिलोठिया यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्याजागी नियुक्ती केली असल्याचं, सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी सांगितलं.

नितीन राऊत

राजेश लिलोठिया यांची एससी विभागाच्या अध्यक्षपदी तर के. राजू यांना काँग्रेसच्या अनुसुचित जाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक तसंच आदिवासी विभागाच्या समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

4. गोमांस खाण्यात काही गैर नाही असं सावरकरांनी लिहून ठेवलंय - दिग्विजय सिंग

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी गाय आणि सावरकरांवरून केलेल्या एका वक्तव्यानं पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गायीला हिंदू धर्मात मातेचा दर्जा असला, तरी गाय ही आपली माता असूच शकत नाही. त्यामुळं गोमांस खाण्यात काहीच चुकीचं नाही, असं सावरकरांनी पुस्तकात लिहिलं आहे, असा दावा दिग्विजय सिंग यांनी भोपाळमध्ये केला आहे. इंडिया टुडेनं याबाबचं वृत्त दिलं आहे.

दिग्विजय सिंग

फोटो स्रोत, Facebook/Digvijay Singh

काही पुस्तकांचा दाखला देत दिग्विजय सिंग यांनी ही वक्तव्यं केली. काही हिंदू गोमांस खातात आणि ते खाऊ नये असं कुठं लिहिलं आहे का? असं विचारत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांचा आपसांत काही संबंध नसल्याचंही सावरकरांना एका पुस्तकात म्हटलं असल्याचं सिंग यांनी यावेळी म्हटलं आहे.

5. गटारात जीव गुदमरून मेलेल्यांच्या वारसांना दहा लाखांची मदत देणार

सोलापूरमध्ये भुयारी गटारात जीव गुदमरून मृत्यू झालेल्या चार सफाई कामगारांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाखांची मदत करणार असल्याचं महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितलं आहे. लोकसत्तानं याबाबचं वृत्त दिलं आहे.

त्याचबरोबर या घटनेतील आणखी दोन जणं गंभीर जखमी असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्चदेखील महानगर पालिकेककडून केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सोलापुरात कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर सफाई कर्मचारी खोल भुयारी गटारीत उतरले होते. त्यावेळी एका जणाला वाचवण्यासाठी आणखी पाच मजूर मागे गेले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)