कोरोना Delta Plus : महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 66 रुग्ण आणि 5 मृत्यू, 10 जणांनी घेतले होते लशीचे दोन्ही डोस

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे आतापर्यंत 66 रुग्ण आढळले असून यापैकी 10 जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने गोळा करण्यात येत असून यापैकी किती जणांना डेल्टा प्लसची लागण झालेली आहे, याचा शोध घेण्यात असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.
DMER - डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन रिसर्चद्वारे या चाचण्या करण्यात येत आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "डेल्टा प्लसचे राज्यात 66 रुग्ण झाले आहेत. त्यासंदर्भात उपाययोजना म्हणजे या केसेसची पास्ट हिस्टरी - त्यांनी लस घेतली का, त्यांना लागण कुठे झाली असावी याची हिस्ट्री आम्ही घेतो. त्याच्या अनुषंगाने त्यांच्या संपर्कात असणारे हाय रिस्क आणि लो रिस्क काँटॅक्ट्सचं आयसोलेशन करतो. आणि त्यांच्या चाचण्या करून गरज पडल्यास ट्रीटमेंट देतो."
महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे कुठे किती रुग्ण?
राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे 66 रुग्ण नोंदवण्यात आले असून आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातली डेल्टा प्लसची जिल्हावार रुग्णसंख्या याप्रमाणे आहे.
- जळगाव - 13
- रत्नागिरी - 12
- मुंबई - 11
- ठाणे - 6
- पुणे - 6
- पालघर - 3
- रायगड - 3
- नांदेड - 2
- गोंदिया - 2
- चंद्रपूर - 1
- अकोला - 1
- सिंधुदुर्ग - 1
- सांगली - 1
- नंदूरबार - 1
- औरंगाबाद - 1
- कोल्हापूर - 1
- बीड - 1
या रुग्णांमध्ये पुरुष आणि महिलांचं प्रमाण जवळपास समान आहे.
डेल्टा प्लस आणि लसीकरण
कोरोनासाठी देण्यात येणाऱ्या लशी व्हेरियंट्सवर किती प्रभावी आहेत, याची चर्चा सध्या सुरू आहे. डेल्टा प्लस रुग्णांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली.
- डेल्टा प्लसच्या या रुग्णांपैकी 10 लोकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते.
- 66 पैकी 8 लोकांनी लशीचा एक डोस घेतलेला आहे.
- लस घेतलेल्या एकूण लोकांपैकी 2 जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतलेली आहे.
- लस घेतलेल्या 18 जणांपैकी 16 जणांनी कोव्हिशील्ड लस घेतलेली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
आता पर्यंत डेल्टा प्लसचा संसर्ग झालेल्या 5 जणांचा मृत्यू झाल्याचं राजेश टोपेंनी सांगितलंय. पण या रुग्णांना इतर सहव्याधीही असल्याने डेल्टा प्लसमुळेच या रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हणता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या रुग्णांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त होतं.
डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे?
डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी बदल म्हणजेच म्युटेशन्स होऊन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झालाय. 'डेल्टा प्लस' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आलंय, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
भारतात सर्वात पहिल्यांदा आढळून आलेल्या 'डेल्टा व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2 आहे. त्यानंतर डेल्टा व्हेरियंटमध्ये हळूहळू बदल होत गेले. 'डेल्टा प्लस' व्हेरियंट'चं शास्त्रीय नाव B.1.617.2.1 असं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
66 डेल्टा पल्स केसेस10 जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते 8 जणांनी एक डोस घेतलाय 2 लोकांनी कोव्हॅक्सीन तर 16 लोकांनी कोव्हिशिल्ड घेतली होती
























