Tokyo Olympics: दीपक पुनियाचा पराभव, कांस्य पदक हुकलं

फोटो स्रोत, Getty Images
ऑलिंपिक कुस्तीमध्ये 86 किलो वजनी गटात खेळणाऱ्या पैलवान दीपक पुनियाचा पराभव झाला आहे.
सॅन मेरिनोचा माइल्स एमिने याने त्याचा 2-3 असा पराभव केला आहे. त्यामुळे पुनियाचं कांस्य पदक हुकलं आहे.
हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील छारा गावात दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातल्या दीपक पुनियाने ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास अवघ्या 7 वर्षांत पूर्ण केला.
त्याचे वडील सुभाष 2015 ते 2020 या काळात रोज 60 किमी अंतरावर असलेल्या छत्रसाल स्टेडियममध्ये दीपकला घरचं दूध, सुकामेवा आणि फळं पोहोचवत. ऊन असो, थंडी असो किंवा पाऊस यात खंड पडला नाही.
डाएटमुळे दीपकच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये, याकडे ते कटाक्षाने लक्ष देत.
दीपक पुनियाच्या जवळचे त्याला 'केटली पहलवान' म्हणूनही ओळखतात. वयाच्या चौथ्या वर्षीच त्याला ही उपाधी मिळाली.
झालं असं की गावच्या सरपंचांनी 4 वर्षांच्या दीपकला एका किटलीतलं दूध प्यायला सांगितलं. त्यानं एका घोटात सगळं दूध संपवलं. मग सरपंचांनी त्याला आणखी एक किटली दिली. दीपकने तीही संपवली. एक-एक करत दीपकने 5 किटली दूध पिऊन फस्त केलं.
रँकिंग
4 वर्षांचा मुलगा एवढं दूध पिताना बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हापासूनच गावातले सगळे त्याला 'केटली पहलवान' म्हणून संबोधू लागले.
केवळ नोकरी मिळावी, म्हणून दीपकने कुस्ती खेळायला सुरुवात केली. पण, एक-एक करत तो कॅडेट (2016) आणि ज्युनिअर कॅटेगरी (2019) मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनले.
दीपक पुनियाने 2019 साली कझाकिस्तानमधल्या नूर सुल्तानमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्व्हर मेडल पटकावत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























