मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांना ट्विटरवर बाप काढणं पडलं महागात #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. ट्विटरवर बाप काढणं मुंबईच्या महापौरांना पडलं महागात
सोशल मीडियावर ट्रोल करणं, आडवेतिडवे प्रश्न विचारणं हे आता काही नवं नाही. पण अशा एका प्रश्नाला उत्तर दिल्यामुळे आणि त्याउत्तरात प्रश्न विचारण्याचा बाप काढणं मुंबईच्या महापौरांना महागात पडलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत ट्विटरवर शेअर केली होती. 1 कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरचा आणि त्याला 9 कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याचा त्यात उल्लेख होता.
त्यावर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना महापौरांनी 'तुझ्या बापाला' असे उत्तर दिले. यानंतर महापौरांवर ट्वीटरवर टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी ट्वीट डीलिट केले. न्यूज 18 लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
2. 'मातोश्री 'ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही'
राज्यातील राजकीय घडामोडींना आणि राजकीय नेत्यांच्या विधानांचं सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
त्यानंतर ते एकनाथ खडसे यांच्या जळगावमध्ये भेट देऊन आले.

फोटो स्रोत, Getty Images
या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टिप्पणी केली होती. 'असेच एक दिवस ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवरही येतील' अशी टिप्पणी राऊत यांनी फडणवीसांसदर्भात केली होती. त्याला फडणवीस यांनी 'मातोश्री 'ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही' असं उत्तर दिलं आहे.
जळगाव नंतर देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राऊत यांना उत्तर दिले आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.
3. 'जनता ठरवेल काम किती केलं आणि वसुली किती केली ते'
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याचा शिवसेनेचा डाव आहे तो आम्ही हाणून पाडू असं विधान भाजपचे नेते आशीष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं होतं.
'शिवसेना कामाच्या बळावर निवडणूक जिंकते. शिवसेनेनं मुंबईत चांगलं काम केलं आहे, त्यामुळे निवडणूक हरण्याचा प्रश्नच नाही', असं उत्तर पेडणेकर यांनी दिलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
त्याला आता भाजपच्या अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. "कोरोना काळात मुंबईत शिवसेनेने चांगलं काम केलंय, निवडणूक हरण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगतायत महापौर किशोरीताई पेडणेकर... जनतेला ठरवू देत ताई. तुम्ही काम किती केलं आणि वसुली किती केली ते. मुंबईची तुंबई झाली की तुमचं पितळ उघडे पडेलच. कोरोना काळातले मृत्यूदेखील जनता विसरलेली नाही," असं उत्तर भातखळकर यांनी दिलं आहे. महाराष्ट्र देशा या वृत्तस्थळाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
4. कोरोना काळात पोलिसांनी संवेदनशीलपणे प्रकरणं हाताळावीत- हायकोर्ट
कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे पहिल्यांदाच अन्नधान्याची चोरी करणाऱ्यांची प्रकरणं संवेदनशीलपणे हाताळावीत, अशांना तुरुंगामध्ये डांबून समस्या सुटणार नाही असे आदेश मुंबई हायकोर्टाने काल दिले आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या गुन्ह्यांचा तपशील राज्य सरकारने सादर करावा असे न्यायालयाने सांगितले आहे. एबीपी माझाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना काळात अटकेबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती देऊन पोलिसांना संवेदनशील करायला हवं, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अटकेआधी पोलिसांनी याची खात्री करावी की संबंधित गुन्ह्यात अटक आणि रिमांड गरजेचा आहे का?, कारागृहात असलेल्या रिक्त वैद्यकीय पदांच्या नियुक्ती बाबतही हायकोर्टानं विचारणा केली.
5. मिरजेमध्ये ऑक्सिजन टँकला गळती
सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय रुग्णालयात काल बुधवार 2 जून रोजी रात्री अचानक ऑक्सिजन टँकला गळती लागल्याचे दिसून आले. 6 हजार लीटर क्षमतेचा हा टँक आहे.
गळतीची घटना स्पष्ट होताच जिल्हाधिकारी, पोलीस, अग्निशमन दल तेथे हजर झाले आणि गळती काढण्याचे काम सुरू झाले.
या गळतीचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. या रुग्णालयात 350 रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात 80 व्हेंटिलेटर्स आणि अतिदक्षता विभागाचे 200 बेड्स आहेत. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























