तामिळनाडूत विमानामध्ये लावलं लग्न, DGCAने दिले चौकशीचे आदेश

विमान, लग्न, कोरोना

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

तामिळनाडूत एका जोडप्यानं विमानप्रवासातच लगीनगाठ बांधली. 'हवेतल्या' या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर एकीकडे हा चर्चेचा विषय ठरला, तर दुसरीकडे वादाचाही. कारण या लग्नामुळे विमान कंपनी स्पाईस जेट अडचणीत आलीय.

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात DGCA ने विमानातील लग्नाच्या या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर विमान कंपनीनं लग्नावेळी विमानात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.

नेमकं काय घडलं?

मदुराई (तामिळनाडू) हून उड्डाम केलेल्या स्पाईस जेटच्य विमानात एका जोडप्यानं लग्न केलं. वधू-वराकडील नातेवाईक आणि पाहुणेमंडळीही याच विमानात होती.

विमान, लग्न, कोरोना

फोटो स्रोत, ANI

मदुराईतल्या एका व्यक्तीनं हवाई प्रवासात लग्नासाठी रविवारी (23 मे) स्पाईस जेटचं चार्टर फ्लाईट बुक केलं. पण विमान कंपनी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, विमानात लग्नसमारंभ केला जाईल, याची माहिती देण्यात आली नव्हती.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मदुराई विमानतळाचे संचालक एस. सेंथील वलावन यांनी एएनआय वृत्तसेवा संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "स्पाईसजेटचं चार्टर्ड फ्लाईट काल बुक केलं होतं हे खरंय. पण हवाई प्रवसात लग्नासाठी ते बुक केल्याबाबत विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं."

DGCA कडून चौकशीचे आदेश

अगदी दोन-चार दिवसांपूर्वीच DGCA नं आदेश दिले होते की, जे प्रवासी कोव्हिडच्या नियमांचं पालन करणार नाही किंवा मास्क नीट परिधान करणार नाही, त्यांना विमानात प्रवेश देऊ नका. त्यानंतर लगेच ही मदुराईतली ही घटना समोर आल्यानं DGCA काय कारवाई करतं, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

DGCA नं मदुराईतल्या विमानात लग्नाच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, विमान कंपनीकडे पूर्ण अहवाल मागितला आहे. कोव्हिड नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही DGCA नं दिलाय.

दुसरीकडे, विमान कंपनीने कोव्हिड नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

तामिळनाडूत लग्नसमारंभासाठी कोरोना काळात काय नियम आहेत?

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये 31 मे 2021 पर्यंत लॉकडॉऊन वाढवण्यात आला आहे. मास्क आणि अंतर पाळणं बंधनकारक आहे.

तामिळनाडूत लग्नसमारंभासाठी आंतरजिल्हा प्रवासाची परवानही आहे. मात्र, त्यासाठी ई-रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे.

मात्र, ही नोंदणीसुद्धा लग्नासमारंभाशी संबंधित व्यक्तीनं करणं आवश्यक आहे. https://eregister.tnega.org या वेबसाईटवर ही नोंदणी तामिळनाडूत करता येते.

ज्या कुटुंबात लग्नसोहळा आहे, त्यांच्याशी संबंधितच (नवरा, नवरी, आई, वडील, सासू, सासरे इत्यादी) व्यक्ती ई-रजिस्ट्रेशन करू शकतं. विशेष म्हणजे, जी व्यक्ती नोंदणी करणार आहे, तिचे नाव लग्नपत्रिकेवर असलं पाहिजे आणि त्या पत्रिकेची प्रतही रजिस्ट्रेशनदरम्यान अपलोड करावी लागेल.

प्रवासाचं रजिस्ट्रेशन करताना चालकाचं नाव, मोबाईल नंबर, सर्व प्रवाशांची नावं आणि त्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड, पासपोर्ट) आवश्यक आहे..

जर यात काही फसवणूक केल्य एपिडेमिक डिसिज अॅक्ट, 1897 आणि डिझॅस्टर मॅनेजमेंट अॅक्ट 2005 नुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)