मराठा आरक्षण : 'मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन करणार' - विनायक मेटे

मराठा महिला

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपण पुनर्विचार याचिकेसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा सर्व मुद्दे समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिकेसाठी अर्ज आम्ही करणार आहोत."

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण सुनावणी निकाली काढली असली तरी याचिकाकर्त्यांना पुनर्विचार याचिका दाखल करता येते. त्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करावा लागतो.

पुनर्विचार याचिका दाखल करून घ्यायची की नाही हे मात्र सुप्रीम कोर्ट ठरवतं, असं वकील राकेश टेकाळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं.

'बीडमधून पहिला मोर्चा'

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला योग्य पद्धतीने कोर्टात आपली बाजू मांडता आली नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक आणि आमदार विनायक मेटे यांनी याप्रकरणी मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

विनायक मेटे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विनायक मेटे

बीड जिल्ह्यातून मराठा समाजाचा पहिला मोर्चा काढणार असल्याचा इशाराही मेटेंनी दिला आहे.

ते म्हणाले, "बीडमध्ये आज मराठा समाजाची बैठक पार पडली. यावेळी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 16 मे रोजी पहिला मोर्चा काढण्यात येणार असून हे मोर्चे राज्यव्यापी होतील."

मराठा आरक्षणासाठी बाजू मांडण्यात सरकारकडून कोणतीही उणीव राहिली नाही, संपूर्ण तयारी करून बाजू मांडल्याचं स्पष्टीकरण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याप्रकरणी बुधवारी (5 मे) जाहीर निवेदन केलं. मराठा आरक्षणाचा निर्णय आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)