यवतमाळमध्ये गरोदर वाघिणीची शिकार, दोन पंजे कापून नेले

वाघीण, पांढरकवडा

फोटो स्रोत, NITESH RAUT

फोटो कॅप्शन, वाघीण, पांढरकवडा
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

यवतमाळमध्ये गरोदर वाघिणीची शिकार करून, तिचे दोन पंजे कापून नेल्याची घटना घडली आहे.

पांढरकवडा वनविभागाअंतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्षमध्ये वाघीण मृतावस्थेत आढळून आली.

रविवारी (25 एप्रिल) सकाळी सुमारे 10.30 वाजता गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघीण मृतावस्थेत आढळून आली.

वाघिणीचं वय 4 वर्ष असावे असं अंदाज आहे. वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडल्याचेही आढळून आले आहे.

शिकारीसाठी एका छोट्या गुहेजवळ फास लावण्यात आला होता. रानडुक्कराच्या शिकारीसाठी परिसरात फासे लावले जातात. वाघीण त्या फासात अडकली आणि गुहेत शिरली. त्यानंतर शिकाऱ्यांनी गुहेबाहेरील परिसर जाळला. त्यात गुदमरून वाघिणीचा मृत्यू झाला.

मृत्यूची खात्री पटण्यासाठी शिकाऱ्यांनी धारदार शस्त्राने वाघिणीला टोचले असावे, असाही अंदाज आहे. गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जळालेल्या लाकडांवरून निदर्शनास आले आहे.

वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

वाघिणीच्या मृत्यूनंतर विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक (वन्यजीव), पांढरकवडा, मुकुटबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांचे प्रतिनिधी तसेच मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि वस्तुस्थितीचे पाहणी केली.

सदर जागेची तपासणी केली असता वाघ नाल्याला लागून असलेल्या गुहेत मृत अवस्थेत दिसून आला. गळ्यात तारेचा फास अडकल्याचे, धारदार हत्याराने मारल्याचे आणि गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जाळलेल्या लाकडांवरून निदर्शनास आले आहे.

वन विभागाच्या पथकाने शवविच्छेदन केले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. सध्या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

या प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा जारी करून गुन्ह्याचा तपास सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा), पांढरकवडा हे करीत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)