उद्धव ठाकरे सरकारमधील हे 5 मंत्री कोरोनाग्रस्त

फोटो स्रोत, officeofUT
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
1 मार्चपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पण ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने अधिवेशनावरही कोरोनाचं सावट आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू या चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
1. राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते म्हणाले, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. मी लवकरच बरा होऊन सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी."

फोटो स्रोत, SHAHID SHAIKH/BBC
गेल्या आठवड्यात राजेश टोपे यांनी विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. 12 फेब्रुवारीला ते अबंड आणि घनसावंगीमध्ये एका सभागृहाच्या भूमीपूजन सोहळ्यात उपस्थित होते. तिथं महिला बचत गटांना कर्जाचं वाटप करण्याचाही कार्यक्रम पार पडला.
2. जयंत पाटील
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी 18 फेब्रुवारी रोजी दिली.
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी." असं ट्विट करत जयंत पाटील यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

फोटो स्रोत, JAYANT PATIL /FACEBOOK
जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते, मंत्री यांनी अनेक दौरे केले. अनेक जाहीर सभांनाही ते उपस्थित होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्याही विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. 13 फेब्रुवारी रोजी ते जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रमही पार पडला होता.
3. छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भूजबळ यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 22 फेब्रुवारीला त्यांनी याबाबत माहिती दिली.

फोटो स्रोत, BBC/Harshal Khairnar
आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. छगन भूजबळ यांनी आपली प्रकृत्ती बरी असल्याचंही स्पष्ट केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
इतर मंत्र्यांप्रमाणेच छगन भूजबळ यांनीही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. तसंच नाशिकमध्ये एका विवाह सोहळ्यातही ते उपस्थित होते.
4. बच्चू कडू
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आपल्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter/@RealBacchuKadu
19 फेब्रुवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं, "माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी विलगीकरणात आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास चाचणी करून घ्यावी."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
बच्चू कडू काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. विदर्भात विविध महामंडळांच्या बैठकांनाही ते उपस्थित होते.
5. राजेंद्र शिंगणे
अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी 16 फेब्रुवारी रोजी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केलं होतं.

फोटो स्रोत, Dr.Rajendra B. Shingne/facebook
तर 22 फेब्रुवारीला आपण कोरोनामुक्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली. पण 12 दिवस ते विलगीकरणात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वपक्षीय नेत्यांनी पुढील काही दिवसांसाठी आपले सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)