IPL Auction 2021: ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने मोजले 16.25 कोटी रुपये

ख्रिस मॉरिस
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आयपीएल टी-20 स्पर्धेसाठी लिलाव सुरू झाले आहेत. या लिलावात एकूण 61 खेळाडू आहेत. आतापर्यंत सर्वाधिक बोली क्रिस मॉरिसवर लावण्यात आली आहे. क्रिस मॉरिससाठी तब्बल 16.25 कोटी रुपयांची बोली राजस्थान रॉयल्सने लावली आहे.

त्यानंतर ग्लॅन मॅक्सवेलसाठी 14.25 कोटी रुपयांची बोली लावली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलच्या लिलावात खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी रक्कम मोजणं सुरू आहे. यंदा आतापर्यंतच्या लिलावात ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्सवेल आणि जाय रिचर्डसन सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.

ख्रिस मॉरीसला राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलं. त्यानंतर नंबर आहे ग्लेन मॅक्सवेलचा. ग्लेननला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी 25 लाख रुपयांना घेतलं. तर जाय रिचर्डसनसाठी किंग्ज XI पंजाबने 14 कोटी रुपये मोजले आहेत.

तर यंदाचं सगळ्यांचं लक्ष लागून असलेला अर्जुन सचिन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्स संघाने घेतलं. सचिन तेंडुलकर स्वतः मुंबई इंडियन संघाचा मेंटॉर आहे. अर्जुनसाठी 20 लाख रुपये ही बेस प्राईस ठेवण्यात आली होती. त्याच किंमतीला मुंबई इंडियन्सने अर्जुनला आपल्या संघात स्थान दिलं आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परदेशी खेळाडू त्यातही फलंदाजांकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

16 कोटी 25 लाख रुपयांसह ख्रिस मॉरीस आयपीएल इतिहासातला सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2015 साली युवराज सिंहसाठी 16 कोटी रुपयांची बोली लागली होती.

गेल्यावर्षी ख्रिस मॉरिस आरसीबीने 10 कोटी रुपये मोजले होते. यंदा मॉरीससाठी त्यांनी 8 कोटी रुपयांची बोली लावली. मात्र मुंबई, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज XI पंजाबने बोली वाढवत नेली. शेवटी राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपये म्हणत मॉरीसला खेचून आणलं.

आयपीएल

फोटो स्रोत, Ipl

असाच आणखी एक महागडा खेळाडू ठरला ग्लेन मॅक्सवेल. ग्लेनची बेस प्राईस होती 2 कोटी रुपये. ग्लेनसाठी आरसीबी आणि सीएसकेमध्ये चांगलीच जुंपली. कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी रुपयांपासून बोली सुरू केली. त्यानंतर आरसीबीने थेट 4 कोटी रुपयांची बोली लावली.

त्यानंतर बोली वाढत गेली. सीएसकेने 6 कोटी म्हटले.पुढे आरसीबी आणि सीएसके बोली वाढवत गेले. तब्बल 14 मिनिटं मॅक्सवेलसाठी बोली चालली. पण अखेर 14 कोटी 25 लाख रुपये मोजत विराट कोहलीच्या आरसीबीने ग्लेनला आपल्या संघात ओढलं.

आयपीएल

जाय रिचर्डसनसाठी आरसीबीने बोलीला सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबनेही एकावर एक बोली लावली. दिल्लीने 3 कोटी म्हटल्यावर बंगळुरूने 4 कोटी म्हटले. पुन्हा दिल्लीने 5 म्हटले. त्यानंतर बंगळुरूने साडे सात कोटी म्हटले. त्यानंतर पंजाबने 9 कोटी म्हटल्यावर बंगळुरूने थेट 10 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावली.त्यानंतर पंजाबने थेट 12 कोटी म्हटले. अखेर पंजाबने जाय रिचर्डसनला 14 कोटी रुपयांना खरेदी केले.

मोईन अलीसाठी CSK आणि किंग्ज इलेवनमध्ये स्पर्धा झाली.

2 कोटी बेस प्राइस, पण चेन्नईने मोईनला 7 कोटींना घेतले. पंजाबने 5.25 कोटींना जवळपास घेतलेच होते. पण अचानक चेन्नईने शेवटच्या क्षणी 7 कोटी बोलून आघाडी घेतली. 7 कोटीला पंजाबने माघार घेतली आणि मोईन चेन्नईचा झाला.

मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटींना घेतले. त्याची बेस प्राइस होती 50 लाख रुपये. शिवम दुबेसाठी दिल्ली 3.8 कोटी तर हैदराबाद 3.4 कोटी मोजायला तयार होती. पण RR ने बाजी मारली.

उमेश यादवला किंग्ज XI पंजाबने 1 कोटी रुपयांना विकत घेतले.

तर पियुष चावलाला मुंबईने 2 कोटी 40 लाख रुपयांना घेतले.

मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या नेथन कोल्टर नाईलला 5 कोटी रुपयांना घेतले. त्याची बेस प्राईस होती 1.50 कोटी रुपये.

बांग्लादेशचा ऑलराऊंडर शकीब अल हसन KKR ने 3 कोटी 25 लाख रुपयांना घेतले.

इतर खेळाडू

केदार जाधव - सनरायझर्स हैदराबाद (2 कोटी रु.)

मुजीबुर रहमान - सनरायझर्स हैदराबाद (1.5 कोटी रु.)

जगदिशा सुचित - सनरायझर्स हैदराबाद (30 लाख रु.)

हरभजन सिंह - केकेआर (2 कोटी रु.)

करुण नायर - केकेआर (50 लाख रु.)

व्यंकटेश अय्यर - केकेआर (20 लाख रु.)

पवन नेगी - केकेआर (50 लाख रु.)

बेन कटिंग - केकेआर (75 लाख रु.)

करुन नेगी - केकेआर (50 लाख रु.)

वैभव अरोरा - केकेआर (20 लाख रु.)

शेल्डन जॅक्सन - केकेआर (20 लाख रु.)

सॅम बिलिंग्ज - दिल्ली कॅपिटल्स (2 कोटी रु.)

एम. सिद्धार्थ - दिल्ली कॅपिटल्स (20 लाख रु.)

विष्णू विनोद - दिल्ली कॅपिटल्स (20 लाख रु.)

लुकमन हुसैन मेरिवाला - दिल्ली कॅपिटल्स (20 लाख रु.)

रिपल पटेल - दिल्ली कॅपिटल्स (20 लाख रु.)

मुस्तफिझुर रहमान - राजस्थान रॉयल्स (1 कोटी रु.)

चेतन सकारिया - राजस्थान रॉयल्स (1 कोटी 20 लाख रु.)

लियाम लिव्हिंगस्टोन - राजस्थान रॉयल्स (75 लाख रु.)

आकाश सिंह - राजस्थान रॉयल्स (20 लाख रु.)

कुलदीप यादव - राजस्थान रॉयल्स (20 लाख रु.)

के. सी. करिअप्पा - राजस्थान रॉयल्स (20 लाख रु.)

सी. हरी निशांत - चेन्नई सुपर किंग्ज (20 लाख रु.)

के. भगत वर्मा - चेन्नई सुपर किंग्ज (20 लाख रु.)

एम. हरिशंकर रेड्डी - चेन्नई सुपर किंग्ज (20 लाख रु.)

जेम्स निशम - मुंबई इंडियन्स (50 लाख रु.)

युवधीर चरक - मुंबई इंडियन्स (20 लाख रु.)

मार्को जॅनसेन - मुंबई इंडियन्स (20 लाख रु.)

फॅबियन अॅलेन - पंजाब किंग्ज (75 लाख रु.)

सौरभ कुमार - पंजाब किंग्ज (20 लाख रु.)

जलज सक्सेना - पंजाब किंग्ज (30 लाख रु.)

उत्कर्ष सिंह - पंजाब किंग्ज (20 लाख रु.)

सुयश प्रभूदेसाई - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (20 लाख रु.)

के. एस. भगत - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (20 लाख रु.)

मोहम्मद अझरुद्दीन - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (20 लाख रु.)

रजत पाटीदार - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (20 लाख रु.)

अनसोल्ड

अनेक असे दिग्गज बॅट्समन आणि बॉलर्स होते ज्यांना यावेळी खरेदीदार मिळाले नाही. यात 2 कोटी रुपये बेस प्राईस असणारा जॅसन रॉय, दिड कोटी बेस प्राईस असणारे अॅलेक्स कॅरी, शॉन मार्श, बॉलर आदिल रशीद, बिली स्टॅनलेक, 1 कोटी रुपये बेस प्राईस असणारे ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर अॅरॉन फिंच, वेस्ट इंडिजचा एव्हिन लेव्हिस, भारताचा हनुमा विहारी, मॅथू वेड यांना कुणीही घेतलं नाही.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)