भंडारा रुग्णालय आगीसाठी 2 नर्सेसचा निष्काळजीपणा कारणीभूत - राजेश टोपे

भंडारा रुग्णालय आगीसाठी 2 नर्सचा निष्काळजीपणा कारणीभूत- राजेश टोपे

फोटो स्रोत, SHAHID SHAIKH/BBC

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भंडारा येथील रुग्णालयाला आग लागण्यासाठी तेथे ड्युटीवर असणाऱ्या 2 नर्सचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसते अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जानेवारी महिन्यात भंडारा येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये दहा बाळांचा मृत्यू झाला होता.

याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले, "रात्री साधारण 12 मिनिटांच्या काळामध्ये एक लहानसा स्पार्क इथं झाला. त्यानंतर तो वाढत गेला आणि आग लागली. त्यावेळेस मुलं जिथं ठेवली होती तिथे दोन नर्सेसची ड्युटी होती. ड्युटीच्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहाणं आवश्यक होतं. मात्र त्या जागेच्या बाहेर होत्या.

त्या दोघी त्यावेळेस काय करत होत्या, त्यांच्या फोनच्या डिटेल्सवरुन शोधण्यात येत आहे. त्याचा डेटा भंडाऱ्याचे एसपी देत आहेत. नर्सेसचा निष्काळजीपणामुळे प्राथमिक स्वरुपात दोषी असल्याचं दिसतं.

त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. सीसीटीव्ही आणि पोलिसांची लेखी रिपोर्ट आल्यानंतर एफआयआर दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होईल. कोणालाही पाठी घालण्याचा सरकार प्रयत्न करत नाहीये. "

भंडारा आग

फोटो स्रोत, Pravin Mudholkar/BBC

यापूर्वी "भंडाऱ्यातील घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीची चौकशी पूर्ण झाल्यावर रिपोर्टच्या आधारे दोषींवर कारवाई करू. राज्यातील सर्व रुग्णालयात फायर ऑडिट, स्ट्रक्टरल ऑडिट केलं जाईल," अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

"भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल," असंही राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

तर "भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या घटनेची उच्च स्तरीय चौकशी जाहीर करण्यात आली आहे. आगीच्या कारणांची चौकशी तज्ज्ञ मंडळी करत आहे. जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल," असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.

नेमकं काय घडलं?

रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आलं. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितलं असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.

भंडारा आग

फोटो स्रोत, Pravin Mudholkar/BBC

त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं.

या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली 7 बालकं वाचवण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)