ख्रिसमसवेळी चर्चबाहेर, परिसरात दुकानं, स्टॉल नको-राज्य सरकार

कोरोना, ख्रिसमस

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, ख्रिसमससंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

ख्रिसमसच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडू नये यासाठी राज्य सरकारने सणानिमित्ताने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात नाइट कर्फ्यू जारी केला.

सरकारच्या मार्गदर्शक सूचना

  • चर्चमध्ये जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभा आयोजित करावी
  • चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • येशू ख्रिस्तांच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळावं.
  • येशू ख्रिस्तांचं स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत-जास्त 10 गायकांचा समावेश करावा. वेगवेगळे माईक वापरावेत.
  • चर्चबाहेर आणि परिसरामध्ये दुकानं, स्टॉल लावण्यात येऊ नयेत
  • 60 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना आरोग्याच्या दृष्टीने बाहेर नेणं टाळावं. त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची व्यवस्था करावी
  • गर्दी होणार नाही अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये. मिरवणूक काढली जाऊ नये
  • फटाक्यांची आतषबाजी करू नये.
  • 31 डिसेंबरला चर्चमध्ये मध्यरात्री आयोजित करण्यात येणारी (Thanks Giving Mass) प्रार्थना संध्याकाळी 7 वाजता आयोजित करावी.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)