दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा स्थगित करण्याचा विचार नाही - रेल्वे मंत्रालय

रेल्वे

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

दिल्लीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता दिल्ली मुंबई रेल्वे आणि विमान सेवा स्थगित होऊ शकतात अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. पण रेल्वेचा असा कोणताही विचार नाही अशी स्पष्टोक्ती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

विमान सेवेबाबतही असा कोणताही निर्णय आला नसल्याचे नागरी उड्डयन मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी टाइम्स नाऊ सांगितले.

याआधी, दिल्ली-मुंबई रेल्वे आणि विमान सेवा स्थगित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी माहिती मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली आहे.

नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली. यानंतर दिल्ली सरकारने हॉटस्पॉट असलेले बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

विमान सेवा किंवा रेल्वे सेवा बंद करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच त्याबाबत अद्याप काही औपचारिक पत्रव्यवहार झाला नाही.

ऑक्टोबर 28 ते 10 नोव्हेंबर या काळात दिल्लीमध्ये रोज 5000 रुग्णांची नोंद होती होती. पण 11 नोव्हेंबरला 8,000 रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून हा आकडा कमी होत नसल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासांमध्ये 7,500 रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना
लाईन

राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. राजस्थान आणि हरियाणात वाढलेल्या रुग्णसंख्येचा परिणाम दिल्लीवरही जाणवत असल्याची लक्षणं आहे.

दिल्लीमध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड भरावा लागत असे आता दंडाची रक्कम वाढवून 2000 रुपये करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)