कोरोना व्हायरस : दिवाळीनंतर कोव्हिड 19ची रुग्णसंख्या वाढण्याची भीती का आहे?
Published
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणाऱ्या कोव्हिड 19च्या रुग्णसंख्येत गेला काही काळ घट होत असली, तरी दिवाळीनंतर ही रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी, फटाके वाजवल्याने वाढणारं प्रदूषण या सगळ्याचा एकत्रित परिणाम रुग्णसंख्या वाढण्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.