अजित पवार कोरोनामुक्त, ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना ब्रिचकॅन्डी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

26 ऑक्टोबरला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सात दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. पुढचे काही दिवस ते विलगीकरणात राहून घरूनच करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महत्त्वाच्या बैठकांना ते व्हीसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

"राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे," असं म्हणत अजित पवार यांनी लोकांचे आभार मानले आहेत.

स्वतः दिली होती माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ट्वीट करून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.

"माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

त्याआधी अजित पवारांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यांनी बारामती आणि परिसराची पाहणी त्यांनी केली. सोलापूर आणि पंढरपूरचा दौरासुद्धा त्यांनी केला होता.

त्यानंतर एक-दोन दिवसातच ते घरी क्वारंटाईन झाले होते. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. 21 ऑक्टोबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण ती निगेटिव्ह आली होती.

सोमवारी (26 ऑक्टोबर) अजित पवार तपासणीसाठी ब्रीच कँडीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)