महाराष्ट्रात रविवारपासून जीम सुरू; तुम्ही कधी जाणार आहात जीममध्ये?
Published
महिलांना ठराविक वेळेत मुंबई लोकलमधून प्रवास करता येणं शक्य झाल्यानंतर आता मुंबईकरांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतलाय. बेस्टच्या बसेस सुरु करायला परवानगी देणारं पत्र राज्य सरकारने बेस्ट प्रशासनाला जारी केलंय. बेस्टच्या बसेसमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक असेल. तसंच राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत फिटनेसप्रिय लोकांना खुशखबर दिली आहे. येत्या येत्या रविवारपासून म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून जिम म्हणजेच व्यायामशाळा उघडायला परवानगी मिळाली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)