IPL 2020: शिखर धवनचा सलग दोन शतकांचा विक्रम

फोटो स्रोत, BCCI/IPL
सलामीवीर शिखर धवनने आयपीएल स्पर्धेत सलग दोन मॅचमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम केला. दिल्ली कॅपिटल्ससाठी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना धवनने दुसऱ्या शतकाची नोंद केली.
अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर दोन रन्स घेत दुसऱ्या शतकाला गवसणी घातली.
धवनने 20 ओव्हर बॅटिंग करताना 61 बॉलमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांसह 106 रन्सची खेळी केली.
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना धवनने 58 बॉलमध्ये 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 101 रन्सची खेळी केली होती.
टीम इंडियाचा ओपनर असलेल्या शिखरने आयपीएलचे सर्व हंगाम खेळले आहेत. इतके हंगाम खेळूनही धवनच्या नावावर आयपीएलमध्ये शतक नव्हतं. मात्र यंदा धवनने ही कसर भरून काढली.
शिखरने आयपीएल स्पर्धेत दिल्ली, मुंबई, हैदराबाद या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. हैदराबाद संघाचं नेतृत्वही केलं आहे.
बारा वर्षात आयपीएल स्पर्धेत धवनच्या नावावर शतक नसलं तरी 37 अर्धशतकं आहेत. सलामीला येत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात धवनचा मोलाचा वाटा आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये धावांची टांकसाळ उघडणारा खेळाडू अशी धवनची ओळख आहे.
कसोटी पदापर्णात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम धवनच्या नावावर आहे.
2003-04 U19 वर्ल्डकप स्पर्धेत धवनने तीन शतकांसह 505 रन्स केल्या होत्या. धवनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
धवनने 34 टेस्ट, 136 वनडे आणि 61 ट्वेन्टी-20 मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
हे वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























