कोरोना नाशिक लॉकडाऊन: नाट्यगृह उघडण्याची वाट न पाहता गच्चीवरच सुरू केले नाटकांचे प्रयोग
मार्च महिन्यात नाट्यगृह बंद झाले, तेव्हापासून नाट्यकलावंताचे हाल झाले हा मुद्दा तर आहेच. पण त्याबरोबरीने हाडाच्या कलावंतला आपली कला सादर करण्यासाठी जागाही मिळत नव्हती.
लॉकडाऊनमध्ये प्रॅक्टिस हॉल बंद, नाटक बंद. अशात मुंबईत काम करणारा प्रथमेश जाधव हा कलाकारही सध्या काम नसल्याने घरी नाशिकला परतला. मग त्याने घराच्या गच्चीवरचं स्टेज उभारला आणि प्रॅक्टिस सुरू केली. नंतर अनेक कलावंतानी आपली नाटकं तिथे सादर केली.
आता अनेक ग्रुप मुंबई, औरंगाबाद, पुणे या ठिकाणाहून येऊन आपलं नाटक इथे सादर करतात. हे करताना कोरोना संबंधीची सर्व खबरदारी आणि सरकारी नियमांचं पालन केलं जातं.
एक वेगळी बाब म्हणजे, या प्रयोगांसाठी कुणालाही कोणतंच मानधन दिलं जात नाही. फक्त आपली कला सादर करण्याचं समाधान.
रिपोर्ट आणि शूट – अनघा पाठक
एडिट – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)