मुंबईत मराठीत न बोलणाऱ्या सराफानं मागितली लेखिका शोभा देशपांडेंची माफी

मनसे, शोभा देशपांडे, मराठी

फोटो स्रोत, Social Media

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबईत मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला मनसेने मारहाण केली आहे. या घटनेच्या निमित्ताने मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची दिसून आली.

ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे कुलाब्यातल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या असताना तिथल्या सराफाला मराठीत बोलण्याची विनंती केली. यावरून त्या सराफाने आपल्याला तुच्छ वागणूक देत महिला कर्मचाऱ्यांकडून दुकानातून बाहेर काढलं, असं शोभा देशपांडे यांचं म्हणणं आहे. त्यानंतर काल दुपारपासून त्या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या.

हे प्रकरण मनसेपर्यंत पोहोचल्यानंतर मनसे कार्यकर्ते दुकानात पोहोचले आणि सराफाला समज देण्यासोबतच शोभा देशपांडेंची माफी मागत नाही तोवर दुकान उघडू देणार नाही, असा पवित्रा घेतला. सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे घटनास्थळी पोहोचले आणि सराफाला समज दिली. अखेर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरत त्यांची माफी मागितली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

20 तासांपेक्षाही जास्त काळ शोभा देशपांडे ठिय्या देत होत्या. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. इतक्या तासांच्या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आता त्यांची प्रकृती बरी आहे.

या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोभा देशपांडे यांच्याशी संपर्क साधला आणि घडल्या प्रकाराची माहिती घेतली. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शोभा देशपांडे यांना घरी नेऊन सोडलं.

मुख्यमंत्र्यांशी बोलताना शोभा देशपांडे यांनी त्यांचे आभार मानले तसंच मातोश्रीवरच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. दरम्यान, याविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अशाप्रकारे अपमान करत असेल तर सरकार सोडून द्या, पण शिवसेनासुद्धा त्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील."मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांची मागणी अजिबात चुकीची नाही. मात्र, त्यांना जी वागणूक दिली ती चुकीचीच नाही तर निषेधार्ह आहे. पोलिसांनीही या प्रकरणात असंवेदनशीलता दाखवल्याचं देशपांडे म्हणाले.

सराफाने माफी मागितली असली तरी अजून दुकानाचा परवाना दाखवलेला नाही. त्यामुळे जोवर परवाना बघत नाही तोवर दुकान उघडणार नाही, याची काळजी मनसे घेईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)