आरे कॉलनी जंगल जिथे मुंबई मेट्रो कारशेडसाठी वर्षभरापूर्वी झाडांची कत्तल करण्यात आली होती

Published

मुंबईच्या आरे कॉलनीत आज (4 ऑक्टोबर) झाडांचं वर्षश्राद्ध घालण्यात आलं. गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरच्याच रात्री मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये वृक्षतोड झाली होती, ज्याला पर्यावरणप्रेमी, आदिवासी आणि मुंबईतील नागरिकांनी मोठा विरोध केला होता. एक वर्षानंतर आरेमधले आदिवासी आणि शहरातले अन्य काही नागरीक त्या झाडांचा स्मृतीदिन पाळत आहेत. आरेमधलं जंगल त्यांच्यासाठी एवढं महत्त्वाचं का आहे? सरकारनं आरेमधून कारशेड हटवून वनक्षेत्र घोषित केलं, त्यावर त्यांची भूमिका काय आहे, याविषयी आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

व्हीडिओ रिपोर्ट - जान्हवी मुळे

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)