बॉलिवुड आणि ड्रग्स : अंमली पदार्थांच्या सेवनासाठी 'शिक्षा नको, मदत हवी'? | #सोपीगोष्ट 174

Published

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या पोलीस चौकशीत बॉलिवूडचं एक भीषण सत्य बाहेर आलं. बॉलिवुडमध्ये कथितरीत्या कार्यरत असलेलं ड्रग रॅकेट..

आता तर चौकशीचा फेरा वाढून आघाडीच्या दोन अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सारा अली खान यांचीही चौकशी होते आहे. मीडियामध्ये बातमी आहे की, अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत किमान 50 बॉलिवूडच्या लोकांची नावं आलीत.

भारतात अंमली पदार्थ बाळगणं आणि त्याचं सेवन हा गुन्हा आहे. तरीही बॉलिवूडच काय तरुणांच्या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचं सेवन थांबलेलं नाही. अशावेळी तरुणांमधली ड्रग्जची क्रेझ थांबवण्यासाठी शिक्षा हा उपाय आहे की समुपदेशन? आज सोपी गोष्टमध्ये यावर बोलूया ड्रग्ज सेवनासाठी शिक्षा नको, मदत हवी हा नवा अप्रोच...

संधोशन आणि निवेदना - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)