मासिक पाळी आणि मानसिक आरोग्याचा संबंध काय? - पाहा व्हीडिओ

Published

अनेकदा महिलांची मासिक पाळी चालू असते तेव्हा त्यांना चिडचिडेपणा, अस्वस्थ वाटणं, रडू येणं अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. 70 टक्के महिलांना पाळीच्या वेळेस मूड स्विंग अनुभवायला मिळतात आणि ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे.

पण अनेकदा याहीपुढे जाऊन एखादीची मानसिक अवस्था बिकट असेल, एखादीला नैराश्य किंवा इतर मानसिक विकारांनी ग्रासलं असेल तर त्याचा परिणाम पाळीच्या चक्रावर नक्कीच होतो. पाळी अनियमित होते.

महिला मानसिक तणावत जगत असतील तर तो तणाव पाळी चक्रात अडथळा आणू शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)