You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुंबई-पुणे लॉकडाऊन मध्ये टॅक्सी चालक असे झाले हवालदिल
लॉकडाऊनचा आर्थिक फटका सगळ्यांनाच बसला आहे. पण, पुण्यातल्या अशोक खटावकर आणि त्यांच्या इतर टॅक्सी चालक मित्रांच्या नशिबात आर्थिक चणचणीबरोबरच बँकेची कारवाई कशी चुकवायची ही समस्या आहे. म्हणजेच दु्ष्काळात तेरावा महिना.
मुंबई-पुणे टॅक्सी सेवा जेमतेम सुरू झालेली, आवक घटलेली. आणि त्यातच टॅक्सीचं कर्ज फिटत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांनी लावलेला तगादा आणि मोरेटोरियमच्या काळात आकारलेलं चक्रवाढ व्याज यामुळे त्यांची काळजी वाढली आहे.
मुंबई-पुणे मार्गावर टॅक्सी चालवणारे २० हजारच्या आसपास चालक सध्या काय परिस्थितीत आहेत हे दाखवणारा हा रिपोर्ट...
रिपोर्ट - ऋजुता लुकतुके, राहुल गायकवाड
कॅमेरा- नितीन नगरकर
एडिटिंग - शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)