कोरोना लस भारतात केव्हा, कुठे आणि कधी मिळेल? ICMR च्या वेबसाईटवर मिळणार माहिती

लस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना लशीसंदर्भातील सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) एक पोर्टलच सुरू केलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी (28 सप्टेंबर) या पोर्टलचं उद्घाटन केलं.

या पोर्टलवर कोरोना लशीसंबंधी भारतात तसंच जगभरात सुरू असणारं संशोधन, ट्रायलचे टप्पे यासंबंधीची माहिती मिळू शकेल. व्हॅक्सिन वेब पोर्टल आणि 'National Clinical Registry for COVID-19' आयसीएमआरनं विकसित केले आहेत.

National Clinical Registry for COVID-19 मध्ये कोरोनाची लक्षणं, प्रयोगशाळांमध्ये सुरू असलेलं संशोधन, व्यवस्थापनासंदर्भातले नियम, पेशंटसंदर्भातील माहिती, आजाराची व्याप्ती याबद्दलच्या गोष्टींचं संकलन केलं जाईल.

या सर्व माहितीचा उपयोग हा रुग्णांवरील उपचारांची दिशा ठरविण्यात तसंच संसर्गाच्या तीव्रतेचं आकलन करण्यासाठी होईल, असं ICMR नं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. देशातील लशीची प्रगती कुठपर्यंत आलीये हे जाणून घेण्यासाठी vaccine.icmr.org.in या वेबसाइटला इच्छुक भेट देऊ शकतात, असंही ICMR नं म्हटलं आहे.

कोरोना
लाईन

"कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असताना प्रत्येकजण लस कधी येईल, याची वाट पाहत आहे. अशावेळी देशातील लसीच्या प्रगतीची माहिती एकाच ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे," अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या पोर्टलच्या उद्धाटनावेळी व्यक्त केली.

कोरोना लस

फोटो स्रोत, ICMR

फोटो कॅप्शन, आयसीएमआरचे पोर्टल

रुग्ण बरे होण्याचं वाढणारं प्रमाण आणि घसरता मृत्यूदर हे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोव्हिड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या यशस्वी ठरल्याचं निदर्शक आहे. आज देशात कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी 1,800 लॅब आहेत आणि आता आपण दिवसाला जवळपास 15 लाख चाचण्या करत आहोत, असंही हर्षवर्धन यांनी म्हटलं.

लस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाकाळात अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचेही हर्षवर्धन यांनी कौतुक केलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)