गुजरात : सुरतच्या ONGC मध्ये शक्तिशाली स्फोट, 2 कर्मचारी बेपत्ता

गुजरात ओएनजीसी

फोटो स्रोत, Dharmesh Amin

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

सुरतच्या हाजिरा परिसरातील ONGC कारखान्यात गुरुवारी (24 सप्टेंबर) पहाटे एक शक्तिशाली स्फोट घडल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर कारखान्यात आगसुद्धा लागल्याचं वृत्त आहे.

अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.

ANI ने स्फोटाचा एक व्हीडिओदेखील ट्वीट केला आहे. स्फोटानंतर भूकंप झाल्यासारखं वाटल्याचं स्थानिकांनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बीबीसीने सुरतचे जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल यांच्याशी बातचीत केली.

ते सांगतात, "हाजिराच्या ONGC कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अडीच वाजता हायड्रोकार्बन वायू जमा झाला त्यानंतर 3 वाजून 5 मिनिटांनी एकामागून एक तीन स्फोट झाले.

गुजरात ओएनजीसी

फोटो स्रोत, Dharmesh Amin

अग्निशमन दलासह ONGC चं आगनियंत्रण पथक घटनास्थळी उपस्थित आहे. पोलीस, CISF तसंच संबंधित शासकीय अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित आहेत. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही."

ONGC याठिकाणी वायूचा दाब कमी करण्याबाबत काम करत होती. आग याच परिसरात लागली आहे. कारखान्याच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी आग पसरलेली नाही, असं डॉ. पटेल यांनी सांगितलं.

अग्निशमन दलाचे अधिकारी ईश्वर पटेल यांनीही याबाबत अधिक माहिती दिली.

"मुंबईकडून हाजिराकडे येणाऱ्या गॅस पाईपलाईनला ही आग लागली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण काही ठिकाणी वायूगळती सुरू आहे. वायूगळती बंद होत नाही, तोपर्यंत आग काही प्रमाणात कायम राहू शकते. आग आणि गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय दोन ONGC कर्मचारी बेपत्ता असून त्यांचाही तपास सुरू आहे," असं ईश्वर पटेल म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)