You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहारच्या लौंगी भुइया यांनी डोंगर फोडून बांधला 3 किमी लांब कालवा
लौंगी भुइया हे गेल्या 30 वर्षांपासून हे काम करत आहेत. बिहारमधल्या गया जिल्ह्यातील कोठिलवा गावचे ते रहिवासी आहेत. ते अतिमागासवर्गातल्या समुदयातून येतात. तर सध्या ते 70 वर्षांचे आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने त्यांच्या मेहनतीचं फळ दिसत आहे.
या भागात पाण्याच्या कमकरतेमुळे मका आणि हरबरा या सारखी पीकं घेतली जातात. शेतीतून काहीच उत्पन्न मिळत नाही. म्हणून अनेक तरुण शहरात गेले आहेत, असं स्थानिक लोक सांगतात.
30 वर्षांपूर्वी त्यांनी सगळ्यात आधी पूर्णी डोंगर फिरून पाहिला. गावाकडे कुठून पाणी वळवता येईल याबाबत एक नकाशा तयार केला. त्या नकाशावर आधारीत एकट्याने 30 वर्षं कालवा खोदत राहिले. शेवटी 3 किमी लांब, 5 फूट रुंद आणि 3 फूट खोल असा कालवा तयार केला. भुइया यांनी खोदलेल्या कालव्यानंतर गावात एक तलाव बांधला गेला. त्यामूळे 3 गावांतल्या तब्बल 3 हजार लोकांना याचा फायदा झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)